फोटो सौजन्य - pinterest
23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मोबाईल आणि चार्जरच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली. भारत सरकारने मोबाईल फोनवरील बेसिक कस्टम ड्युटी 20% वरून 15% पर्यंत कमी केली आहे. या कपातीचा परिणाम मोबाईल फोनच्या किमतीवर होणार आहे. म्हणजेच आता भारतात मोबाईल स्वस्त होणार आहेत. आता Apple ने भारतात iPhone च्या किंमती कमी केल्या आहेत. आयफोनच्या प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सच्या किमतीत सर्वाधिक घट झाली आहे. या मॉडेल्सच्या किमती 5100 रुपयांवरून 6000 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. तर भारतात बनवलेल्या iPhone 13, 14 आणि 15 च्या बेस मॉडेलच्या किंमतीत 300 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं Apple Watch For Your Kids फीचर! आता मुलांच्या सुरक्षेची चिंता मिटली
आयफोनच्या प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सच्या किमतीत सर्वाधिक घट झाली आहे. या मॉडेल्सच्या किमती 5100 रुपयांवरून 6000 रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. तर भारतात बनवलेल्या iPhone 13, 14 आणि 15 च्या बेस मॉडेलच्या किंमतीत 300 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या या नव्या घोषणेचा सर्वात आधी Apple कंपनीला फटका बसला असून कंपनीने आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. या यादीमध्ये iPhone 13, iPhone 14 आणि iPhone 15 सिरीजमधील iPhone च्या कमी झालेल्या किंमती आहेत.
हेदेखील वाचा- Apple लवकरच लाँच करणार अतिशय स्वस्त iPhone! AI सह सर्व लेटेस्ट फीचर्सचा असणार समावेश
iPhone 15 च्या 128GB ची किंमत 79,600 रुपये करण्यात आली आहे, जी पूर्वी 79,900 रुपये होती. तर 256GB ची किंमत 89,600 रुपये झाली आहे, जी पूर्वी 89,900 रुपये होती. तसेच 512GB ची किंमत 109,600 झाली आहे, जी पूर्वी 109,900 रुपये होती. iPhone 15 plus मधील 128GB ची किंमत 89,600 रुपये झाली आहे, जी यापूर्वी 89,900 रुपये होती. तसेच 256GB ची किंमत 99,600 रुपये करण्यात आली आहे, जी यापूर्वी 99,900 रुपये होती. तर 512GB ची किंमत 119,600 रुपये झाली आहे, जी पूर्वी 119,900 रुपये होती.
iPhone 15 pro मधील 128GB ची किंमत 129,800 झाली आहे, जी पूर्वी 134,900 रुपये होती. 256GB ची किंमत 139,800 झाली आहे, जी यापूर्वी 144,900रुपये होती. तसेच 512GB ची किंमत159,700 रुपये झाली आहे, जी पूर्वी 164,900 रुपये होती. 1TB ची किंमत 179,400 रुपये करण्यात आली आहे. जी यापूर्वी 184,900 रुपये होती. iPhone 15 Pro Max च्या 256GB ची किंमत 154,000 रुपये करण्यात आली आहे, जी पूर्वी159,900 रुपये होती. 512GB ची किंमत 173,900 रुपये झाली आहे. हि किंमत पूर्वी 179,900 रुपये होती. तसेच 1TB ची किंमत193,500 झाली आहे, जी पूर्वी199,900 रुपये होती.
iPhone 14 च्या 128GB ची किंमत 69,600 रुपये झाली आहे. जी पूर्वी 69,900 रुपये होती. 256GB ची किंमत 79,600 रुपये झाली आहे, ही किंमत पूर्वी 79,900 रुपये होती. 512GB ची किंमत 99,600 रुपये झाली आहे. पूर्वी ही किंमत 99,900 रुपये होती. iPhone 13 ची किंमत 59,600 रुपये झाली आहे. जी पूर्वी 59,900 रुपये होती.