फोटो सौजन्य - pinterest
iPhone SE 4 Leaked Details: लोकप्रिय आणि जगप्रसिध्द टेक कंपनी Apple लवकरच सर्वसामान्यांना परवडेल असा iPhone लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. हा फोन iPhone SE मॉडलेची पुढील जनरेशन असणार आहे. यामध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. iPhone SE 4 हा फोन 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. पण हा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे डीटेल्स लीक झाले आहेत. iPhone SE 4 मध्ये तुम्ही अनेक मोठे बदल पाहू शकता.
हेदेखील वाचा- ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी
iPhone SE 4 मध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. हा आयफोन 16 मध्ये दिसू शकतो. iPhone 16 सिरीज देखील AI फीचर्ससह लाँच केली जाणार आहे. आयफोन 16 चे बेझल खूप पातळ असतील आणि फोन स्क्रीनभोवती एक फ्रेम असेल. कंपनी येत्या सप्टेंबर महिन्यात iPhone 16 लाँच करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. iPhone 16 सीरीज लाँच होण्यासाठी अजून जवळपास 2 महिने बाकी आहेत. ग्राहक iPhone 16 च्या लाँचिगंची वाट पाहत असतानाच आता iPhone SE मॉडलेच्या पुढील जनरेशन iPhone SE 4 चे डिटेल्स लिक झाले आहेत. चला तर मग पाहूया iPhone SE 4 ची किंमत आणि फीचर्स.
iPhone SE मॉडलेच्या पुढील जनरेशन iPhone SE 4 मध्ये 6.06-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या नवीन मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणे 60Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं tvOS 18 बीटा अपडेट! जाणून घ्या फीचर्स
iPhone SE 4 च्या बॅक पॅनलवर सिंगल 48MP कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये iPhone 16 सारखे डिझाईन असू शकतं असं देखील सांगितलं जात आहे.
iPhone SE 4 मध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. हा आयफोन 16 मध्ये दिसू शकतो. यासोबतच या फोनमध्ये iOS 18 अपडेटही दिले जाऊ शकतात. या फोनमध्ये तुम्हाला A18 चिपसेट मिळू शकतो आणि 6GB, 8GB LPDDR5 रॅम दिला जाऊ शकतो. नवीन iPhone SE 4 मध्ये सुरक्षेसाठी फेस आयडी देखील दिला जाईल. iPhone SE 4 मध्ये ॲल्युमिनियम फ्रेम बसवता येऊ शकते. जे सध्याच्या आयफोन लाइनअपच्या डिझाइनप्रमाणे बनवले जाऊ शकते आणि Apple च्या या iPhone मध्ये USB Type-C पोर्ट मिळू शकेल. यामध्ये एक पॉवरफुल चिपसेटही दिला जाऊ शकतो.
iPhone SE 4 ची किंमत 35 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. iPhone SE 4 पुढील वर्षी 2025 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तुम्ही अनेक मोठे बदल पाहू शकता.