Apple ने सुरु केलं Back to School 2024 कॅम्पेन (फोटो सौजन्य - pinterest)
लोकप्रिय टेक कंपनी Apple ने बॅक टू स्कूल 2024 कॅम्पेन सुरू केलं आहे. या कॅम्पेन अंतर्गत विद्यार्थांना मदत केली जाणार आहे. Apple ने सुरु केलेलं हे कॅम्पेन 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. आता पर्यंत apple च्या या कॅम्पेनमुळे अनेक विद्यार्थ्यांना मदत मिळाली आहे. यामध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच या कॅम्पेनमध्ये विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत केली जाते याबाबत देखील कंपनीने सांगितलं आहे.
हेदेखील वाचा- Apple चे iPhone च्या सिक्युरिटी फिचर्सबाबत केले जाणारे दावे खोटे आहेत का? वाचा सविस्तर
Apple ने बॅक टू स्कूल 2024 कॅम्पेन सुरू केली आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना गॅजेट्सच्या खरेदीवर चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये मोफत AirPods आणि Apple Pencil तसेच Apple Care+ वर सूट आणि Apple Music सह TV+ चे मोफत सदस्यत्व यांचा समावेश आहे. हे कॅम्पेन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. ही मोहीम खासकरून अशा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांना ॲपलची उत्पादने ऑफरसह खरेदी करायची आहेत. या मोहिमेत काही वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही उल्लेख आहे, ज्यांना या मोहिमेमुळे मदत झाली आहे.
हे कॅम्पेन मॅकबुक एअर, मॅकबुक प्रो, iMac आणि मॅक मिनीच्या खरेदीसह मोफत एअरपॉड्स ऑफर करते. Apple वेळोवेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी कॅम्पेन लाँच करत असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होते आणि कमी किमतीत आणि ऑफर्ससह गॅजेट्सची खरेदी करता येते. Apple च्या बॅक टू स्कूल कॅम्पेनमध्ये खरेदी केल्यास विद्यार्थ्यांना कंपनीच्या सर्व उत्पादनांवर आकर्षक ऑफर दिल्या जातात, ज्यामुळे हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळते. या मोहिमेत खरेदी केलेली उपकरणे विद्यार्थ्यांच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करत आहेत, याबाबत देखील कंपनीने माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- Apple लवकरच लाँच करणार अतिशय स्वस्त iPhone! AI सह सर्व लेटेस्ट फीचर्सचा असणार समावेश
या कॅम्पेनमध्ये नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थी अनुज पचेल याला मदत झाली आहे. पचेलने त्याच्या वैद्यकीय अभ्यासासाठी मॅकबुक प्रो निवडला आहे. मॅकबुक प्रो अभ्यासासाठी आणि कामासाठी खूप महत्त्वाचा असून या डिव्हाइसच्या बॅटरीचे आयुष्य आणि वेग पाहून अनुज प्रभावित झाला आहे. त्यामुळे या कॅम्पेनदरम्यान अनुजने मॅकबुक खरेदी केले आहे.
बॅक टू स्कूल कॅम्पेनमध्ये इतर विद्यार्थ्यांच्या अनुभवांबद्दल देखील सांगितलं आहे. कॅलिफोर्नियातील टूरो युनिव्हर्सिटीमधील युरा जंग ही विद्यार्थीनी नोट्स घेण्यासाठी आणि सामग्रीचा सारांश देण्यासाठी iPad Air आणि Apple पेन्सिल वापरते. बॅक टू स्कूल ऑफर Apple च्या एज्युकेशनल स्टोअरवर उपलब्ध आहे, जिथे विद्यार्थी विविध प्रकारच्या खास डील्ससाठी खरेदी करू शकतात.
MacBook Air, MacBook Pro, iMac आणि Mac mini ची खरेदी विनामूल्य एअरपॉड्ससह येते, तर iPad Air आणि iPad Pro खरेदीवर विद्यार्थांना विनामूल्य Apple पेन्सिल मिळते. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना Apple Care+ वर 20% सूट आणि Apple TV+ सह मोफत ‘Apple Music Student Plan’ मिळते. Apple च्या Back to School मोहिमेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कमी किमतीची उपकरणे प्रदान करणे आहे.