
Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
Apple ने मंगळवारी पहिल्यांदा 4 ट्रिलियन डॉलर मार्केट वॅल्यूचा टप्पा पार केला आहे. आता Apple हि तिसरी मोठी कंपनी बनली आहे, जिने हे यश गाठलं आहे. यामागील महत्त्वाचं कारण नवीन आयफोन मॉडेल्सची जबरदस्त डिमांड असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळे AI शर्यतीत कंपनीच्या मंद प्रगतीबद्दलची चिंता कमी झाली आहे.
न्यूज एजेंसी रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, Apple चे शेअर्स 9 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 17 नंतर सुमारे 13 टक्क्यांनी वाढले आहेत. हे या वर्षात पहिल्यांदाच झालं आहे, जेव्हा कंपनीचे स्टॉक्स पॉजिटिव झोनमध्ये पोहोचले आहेत. नॉर्थलाइट एसेट मॅनेजमेंटच्या CIO क्रिस जॅकेरेली ने सांगितलं आहे की, ‘आयफोन Apple च्या प्रॉफिट आणि रेवेन्यूचा निम्म्याहून जास्त हिस्सा देते. जितके जास्त आयफोन लोकांच्या हातात असली, कंपनी त्यांची ईकोसिस्टम तेवढीच मजबूत करणार आहे.’ (फोटो सौजन्य – Pinterest)
या वर्षाच्या सुरुवातीला, Apple शेअर्सवर मोठा दबाव होता. याचं कारण चीनमधील प्रतिस्पर्धी आणि अमेरिकेतील टॅरिफ प्लॅनबाबत अनिश्चितता असल्याचं सांगितलं जात आहे. चीन आणि भारतासारख्या आशियाई देशांमध्ये कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग हबवर जास्त कर आकारल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र नवीन iPhone 17 लाइनअप आणि iPhone Air ने लाँचपूर्वी बीजिंगपासून मॉस्कोपर्यंत ग्राहकांना आकर्षित केलं होतं. याच कारणामुळे कंपनीने टॅरिफचा जास्त खर्च सहन केला.
विश्लेषकांनी असं सांगितलं आहे की, iPhone Air चे स्लिम डिझाइन Samsung सारख्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देत आहे. Counterpoint च्या रिपोर्टनुसार, iPhone 17 ची विक्री सुरुवातीला अमेरिका आणि चीनमध्ये कंपनीच्या मागील मॉडेलपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त होती.
Apple कंपनी Nvidia आणि Microsoft नंतर 4 ट्रिलियन डॉलर मार्केट वॅल्यूचा टप्पा पार करणारी तिसरी कंपनी आहे. सध्या, Nvidia 4.5 ट्रिलियन डॉलरहून अधिकच्या मार्केट मार्केट कॅपसह टॉपवर आहे. Apple चा सावध AI दृष्टिकोन गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, कंपनीचे अनेक सीनियर AI एग्जीक्यूटिव यांनी Meta मध्ये प्रवेश केला आहे.
कंपनीने त्यांच्या Apple Intelligence सूट आणि ChatGPT इंटिग्रेशन लाँच करण्यासाठी उशीर केला आहे, तर Siri चे AI अपडेट पुढील वर्षी येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Apple ने Alphabet चे Gemini AI, Anthropic आणि OpenAI सह अनेक टाय-अप्सवर देखील विचार केला जात आहे. जॅकरेली ने सांगितलं आहे की, ‘AI स्ट्रेटजीची कमी कंपनीच्या स्टॉकवर दबाव टाकत आहे.’ एप्रिल-जून तिमाहीत Apple ने चांगले निकाल नोंदवले, सर्व प्रमुख विभागांमध्ये दुहेरी अंकी वाढ झाली. कंपनी आता 30 ऑक्टोबर रोजी चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाचा अहवाल सादर करणार आहे.