Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

BGMI Developer Krafton Update: भारतात अतिशय लोकप्रिय मोबाइल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) बनवणारी कंपनी क्राफ्टन इंडिया अडचणीत सापडली आहे. कंपनीने डेटा गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आणि करार मोडल्याचा आरोप आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2025 | 12:46 PM
BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

BGMI बनवणाऱ्या कंपनीवर मोठा आरोप! युजर्सचा डेटा विकल्याचा केला जातोय दावा, नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आवडता ऑनलाईन गेम बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) आता अडचणीत आला आहे. BGMI तयार करणारी कंपनी क्राफ्टनवर काही गंभीर आरोप करण्यात आले असून आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. खरं तर या आरोपांमुळे BGMI प्लेअर्सचं टेंशन वाढलं आहे. कंपनीवर आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी युजर्सचा डेटा एका दुसऱ्या कंपनीला विकला आहे. या आरोपांमुळे आता कंपनीने करार मोडल्याचा दावा केला जात आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे , कोणी तक्रार केली आहे, याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

आवाजसोबतच डिजिटल स्क्रिनवरही दिसणार पेमेंटची रक्कम! Paytm ने दुकानदारांना दिलं मोठं गिफ्ट, डिव्हाईमध्ये ही आहे खास सेटिंग

काय आहे प्रकरण

एका अहवालानुसार, कंपनीवर युजर्सचा डेटा विकल्याचा आणि गोपनीयता करार मोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील रहिवासीने अकलूज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये क्राफ्टनच्या चार उच्च अधिकाऱ्यांची नावे देखील देण्यात आली आहेत. एफआयआरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की क्राफ्टनने 2 ऑगस्ट 2021 रोजी सेवा करारावर स्वाक्षरी केली होती, परंतु त्या कराराचे उल्लंघन करून, कंपनीने टेलिग्राम सारख्या तृतीय पक्ष प्लॅटफॉर्मवर युजर्सचा डेटा प्रति युजर 2000 रुपये दराने विकला. या तक्रारीनंतर कंपनीविरोधात आयटी कायदा 2000 च्या कलम 72, 72अ आणि 85 तसेच आयपीसीच्या कलम 120-ब (कट रचणे) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

युजर्समध्ये निर्माण झाले तणावाचे वातावरण

हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून जर एखादी कंपनी पैशांसाठी युजर्सचा डेटा दुसऱ्या कंपनीला विकत असेल तर युजर्सनी अ‍ॅप्सवर विश्वास ठेवायचा कसा असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तक्रारदाराने म्हटले आहे की, त्यांनी 2023 मध्येच स्थानिक पोलिस आणि सोलापूरच्या एसपींकडे याबद्दल तक्रार केली होती, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली. 28 ऑगस्ट 2024 रोजी, माळशिरसच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना सीआरपीसीच्या कलम 156(3) अंतर्गत तपास करण्याचे आदेश दिले.

या दिवशी होणार पुढील सुनावणी

हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे, जिथे न्यायमूर्ती सारंग व्ही. कोतवाल आणि डॉ. नीला गोखले यांचे खंडपीठ यावर सुनावणी करत आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटिसा पाठवल्या आहेत आणि पुढील सुनावणी 15 एप्रिल 2025 रोजी निश्चित केली आहे. मात्र या आरोपांमुळे आता युजर्सची चिंता वाढली आहे. BGMI हा एक खूप लोकप्रिय गेम आहे. हे अँड्रॉइडवर 10 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे आणि मोठ्या संख्येने लोक हा गेम अँड्रॉईड आणि iOS वर खेळतात. पण आता या आरोपांमुळे अ‍ॅप्सच्या युजर्सची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

कंपनीने काय म्हटलं?

या गंभीर आरोपांनंतर कंपनीने एक निवदेन जारी केलं आहे. या निवेदनात सांगितलं आहे की, “क्राफ्टनमध्ये वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही डेटा सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करतो. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आम्ही कोणतीही स्पष्ट टिप्पणी देऊ.”

Web Title: Bgmi developer krafton faces accusations of selling users data in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.