भारताच्या पहिल्या GenBeta मुलाला मिळालं Aadhaar Card, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
आपल्या सर्वांकडे आपलं सरकारी ओळखपत्र आधार कार्ड आहे. हे आधार कार्ड म्हणजे आपल्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे. पण इतर सराकारी डॉक्युमेंट्सप्रमाणेच आधार कार्ड देखील केवळ 18 वर्षांवरील व्यक्तिंसाठीच जारी केलं जात, असं तुम्हालाही वाटतं का? तर तुम्ही चुकीचे आहेत. आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जारी केले जाते. ज्यामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं या सर्वांचा देखील समावेश आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही आधार कार्ड बनवले जाते.
आता Beta जनरेशनधील पहिल्या भारतीय मुलाचं आधार कार्ड तयार करण्यात आलं आहे. तुम्ही आतापर्यंत जनरेशनचे वेगवेगळे प्रकार नक्कीच वाचले असतील. ज्यामध्ये GenZ, GenX, Gen Alpha, Generation Beta अशा अनेकांचा समावेश आहे. GenX म्हणजेच 1965-1980 या काळात जन्मलेले, GenZ म्हणजेच 1997-2012 या काळात जन्मलेले आणि GenBeta म्हणजेच 2025-2039 या काळात जन्म घेणारी मुलं. (फोटो सौजन्य – X)
भारतातील पहिल्या जेनबेटा मुलाला त्याचे आधार कार्ड मिळाले आहे, ज्याची माहिती युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने स्वतः त्याच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करून दिली आहे. या पोस्टमध्ये काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. UIDAI ने त्यांच्या अधिकृत X अकाउंटवर एक पोस्ट जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, “भारतातील पहिल्या #GenBeta मुलाला त्याचे #Aadhaar मिळाले! आधार सर्वांसाठी आहे.” जर तुम्हीही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी आधार कार्ड बनवण्याचा विचार करत असाल, तर बाल आधार किंवा ब्लू आधार कार्ड कसे बनवायचे याची प्रोसेस जाणून घ्या.
India’s first #GenBeta child gets his #Aadhaar! Aadhaar is for all.#UIDAI #EaseOfLiving pic.twitter.com/yOsXnHgYSx
— Aadhaar (@UIDAI) April 4, 2025