Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा

Grok At Telegram: तुम्ही आतापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रोकचा वापर केला असेल. पण आता हे एआय चॅटबोट टेलिग्रामवर देखील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता टेलिग्राम युजर्सना देखील याचा फायदा मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2025 | 07:45 PM
Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा

Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा

Follow Us
Close
Follow Us:

एलन मस्कने त्याच्या मालकिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक बदल केले आहेत. मस्कने त्यांच्या युजर्ससाठी आतापर्यंत वेगवेगळे फीचर्स देखील लाँच केले आहेत. शिवाय कंपनीने एक्सवर एआय देखील जोडला आहे. एलन मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी xAI च्या Grok एक्सवर उपलब्ध आहे. युजर्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रोक युजर्सना मदत करतो. एक्सवरील हाच Grok आता टेलिग्रामवर देखील उपलब्ध होणार आहे. ग्रोक टेलिग्राम अ‍ॅपमध्ये डायरेक्ट चॅट टॅबवर पिन केले जाईल, जेणेकरून युजर्स ते सहजपणे वापरू शकतील.

अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लाँच झाले हे नवीन Smartphone, डिझाइन कूल आणि लूक क्लासी! तगड्या बॅटरीने सुसज्ज

xAI आणि Telegram यांची पार्टनरशिप

एलन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी xAI आणि चॅटिंग अ‍ॅप Telegram यांंच्यात एक जबरदस्त पार्टनरशिप झाली आहे. या भागिदारीनंतर टेलिग्रामवर मस्कचा लोकप्रिय AI चॅटबॉट Grok उपलब्ध होणार आहे. टेलिग्रामचे फाउंडर पावेल ड्यूरोवने याबद्दल माहिती दिली आहे. पावेल ड्यूरोवने सांगितलं आहे की, ही भागिदारी एका वर्षासाठी करण्यात आली आहे. याचा फायदा थेट एक अरब युजर्सना होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

भागिदारीचा कसा होणार फयदा?

या भागिदारीनंतर आता Grok चॅटबोट टेलिग्राममध्ये थेट इंटीग्रेट केला जाणार आहे. म्हणजेच आता टेलिग्रामवर चॅटिंग करताना यूजर्स स्मार्ट AI हेल्प मागू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भागीदारीमुळे टेलिग्रामला 300 मिलियन डॉलरचा निधी मिळणार आहे, ज्याचा काही भाग शेअर्सच्या स्वरूपात असेल. एवढेच नाही तर, टेलिग्रामला xAI च्या कमाईच्या 50 टक्के रक्कम मिळेल, जी चॅटबॉटच्या सबस्क्रिप्शनमधून दिली जाणार आहे. त्यामुळे मस्कसोबत करण्यात आलेली ही डिल पावेल ड्यूरोवसाठी फायद्याची ठरणार आहे.

यूजर्सना मिळणार हे नवीन फीचर्स

Grok च्या एंट्रीमुळे आता टेलिग्राममध्ये अनेक नवीन फीचर्स आणि स्मार्ट AI फीचर्स जोडले जाणार आहेत. जून 2025 नंतर सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केलं जाणार आहेत.

Smart Text Editing: आता तुम्ही पाठवलेले मेसेज एडीट करू शकणार आहेत. या मेसेजचा टोन बदलू शकता आणि त्यामध्ये नवीन माहिती जोडू शकता.

Chat Summaries: मोठ्या – मोठ्या मेसेजसाठी चॅटचा सारांश देखील उपलब्ध होणार आहे.

Document Summarization: कोणतेही डॉक्यूमेंट पाठवण्यापूर्वी किंवा पाठवल्यानंतर तुम्हाला त्याचा थोडक्यात आणि सोपा सारांश कळेल.

नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Link Insights: कोणतीही लिंक न उघडता, तुम्हाला त्यात काय आहे ते एका नजरेत कळेल.

Fact Check: टेलिग्राम चॅनेलसाठी हे फीचर सुरु केलं जाणार आहे. कोणतीही माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी हे फीचर त्याची सत्यता तपासणार आहे.

Sticker आणि Avatar Creation: AI च्या मदतीने तुम्ही तुमचे कस्टम स्टिकर आणि प्रोफाइल फोटो बनवू शकता.

ग्रोक फ्री असणार की पैसे मोजावे लागणार?

अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: Big deal between telegram and x now grok will be available at telegram also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • AI technology
  • Social Media
  • Telegram App

संबंधित बातम्या

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे
1

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
2

Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अ‍ॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
3

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच
4

बाबा रे बाबा! लंडनच्या रस्त्यावर अनिरुद्धाचार्य महाराजांचा Range Rover ने प्रवास, कार कलेक्शन तर एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.