BJP'ने लाँच केला सदस्यता अभियान, फक्त एका मिस कॉलने मिळणार मेंबरशिप, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
भाजपने कालपासून सदस्यता अभियान सुरू केले आहे. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला फक्त एका मिस कॉल करायचा आहे. ही सदस्यता मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सदस्यता मोहिमेच्या सुरुवातीला मिस कॉलद्वारे पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. भाजपने ही सदस्यता मोहीम जम्मू-काश्मीर, हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र वगळता संपूर्ण देशात सुरू केले आहे.
तुम्हालाही भाजपचे सदस्यत्व मिळवायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या फोनवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मिस कॉल करावा लागेल. मिस कॉल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज प्राप्त होईल, ज्यामध्ये सदस्यत्व क्रमांक दिला जाईल. बीजेपीने आपल्या एक्स अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा – शॉपिंगसाठी तयार राहा! या दिवशी सुरु होतोय Flipkart Big Billion Days Sale, बंपर ऑफर्ससह करा खरेदी
हेदेखील वाचा – Petrol Diesel Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती झाल्या अपडेट! चेक करा लेटेस्ट रेट
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, आमचा पक्ष या देशातील सर्वात वेगळा पक्ष आहे कारण आम्ही आमच्या सदस्यता मोहिमेचे दर 6 वर्षांनी आणि पूर्णपणे लोकशाही पद्धतीने नूतनीकरण करतो. आमचे कार्यकर्ते सरकार आणि संघटना यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.