ब्राझीलने एक्सवर बंदी घातल्यानंतर मस्कने उडवली खिल्ली (फोटो सौजन्य - pinterest)
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे Elon Musk च्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देशात बंदी घालण्यात आली. देशातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्राझीलमधील सर्वोच्च न्यायालय आणि Elon Musk यांच्यातील हा वाद बऱ्याच काळापासून सुरु आहे. X हा प्लॅटफॉर्म फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीचा प्रचार करतो असा आरोप करत ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने Elon Musk च्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देशात बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
हेदेखील वाचा- Pova 6 Neo 5G स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच! AI फीचर्स आणि 108MP कॅमेऱ्याने सुस्सज
यानंतर आता Elon Musk ने प्रतिक्रिया दिली आहे. Elon Musk ने सांगितलं आहे की, ब्राझीलमधील प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही. प्रशासन योग्य आणि प्रामाणिकपणे काम करेल तेव्हाच आम्ही ही लढाई लढू. शिवाय Elon Musk ने ब्राझीलमध्ये एक्स बॅन करण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. Elon Musk म्हणाला की, X कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. ब्राझील न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांच्याशी झालेल्या वादावर Elon Musk म्हणाला की, हे व्यासपीठ द्वेष पसरवणाऱ्यांविरुद्ध लढत राहील.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर Elon Musk ने न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांना “राजकीयदृष्ट्या प्रेरित” असे म्हटले आहे. भाषण स्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया आहे आणि ब्राझीलमधील एक न निवडलेला न्यायाधीश राजकीय हेतूने त्याचा नाश करत आहे, असे Elon Musk ने म्हटले आहे.
हेदेखील वाचा- Airtel ने लाँच केला स्पेशल फेस्टिव्ह प्लॅन, OTT सारखे फायदे आणि अतिरिक्त डेटा उपलब्ध
या संदर्भात इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या ब्राझीलस्थित तज्ज्ञ वेरिडियाना अलिमोंटी यांनी सांगितलं आहे की, या संदर्भात इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाऊंडेशनच्या ब्राझीलस्थित तज्ज्ञ वेरिडियाना अलिमोंटी म्हणाल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आंतरराष्ट्रीय मानकांवरही नजर टाकली तर संपूर्ण प्लॅटफॉर्म ब्लॉक करणे कठोर मानले जाते. अशा वेळी समस्या अधिक वाढतात. जेव्हा कोणीही व्यासपीठ चुकीच्या आणि योग्य अशा दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन देत असेल.
2023 मध्ये देखील X वर फेक न्यूज पसरवल्याचा आरोप होता. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. यावेळी Elon Musk ला विचारण्यात आले की त्याच्या प्लॅटफॉर्मने खरोखर चुकीची माहिती प्रसारित केली आणि बनावट सामग्रीचा प्रचार केला. या प्रकरणात Elon Musk आणि त्याच्या कंपनीने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक्सवर आरोप करण्यात आले आहेत. X ने दावा केला होता की, मोराएसने कंपनीच्या कायदेशीर प्रतिनिधीला गुप्तपणे अटक करण्याची धमकी दिली होती.
व्यासपीठावरून आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवला नाही, तर अटक केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर एक्सने घोषणा केली की ते ब्राझीलमधील ऑपरेशन्स बंद करेल. मात्र न्यायालयाने सांगितलं की, मोरेस म्हणाले की देशाच्या इंटरनेट-संबंधित कायद्यानुसार, ज्या कंपन्या ब्राझिलियन कायद्याचा किंवा वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा आदर करत नाहीत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तात्पुरते निलंबित केले जाऊ शकतात. यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्या एक्स खात्यावर न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रीनशॉट पोस्ट केला.