BSNL Recharge Plan: सरकारी कंपनी घेऊन आली फॅमिली प्लॅन! 4 SIM आणि 75GB डेटासह मिळणार 'हे' अप्रतिम फायदे
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवणार आहे. अलीकडेच, कंपनीने असे काही प्लॅन लाँच केले आहेत ज्यामध्ये यूजर्सना खूप कमी किमतीत अधिक डेटा आणि कॉलिंगसह अनेक फायदे मिळणार आहेत. खाजगी कंपन्यांशी तुलना करता बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अधिक स्वस्त आणि फायदेशीर असतात. आता देखील कंपनीने असाच एक प्लॅन लाँच केला आहे, जो इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक मजेदार फायदे मिळणार आहेत.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन प्लॅनमध्ये एक दोन नाही तर तब्बल 4 कनेक्शन मिळणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कनेक्शनवर तुम्हाला 75GB पर्यंत डेटा मिळणार आहे. खरं तर कंपनीने एक नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन लाँच केला आहे. या फॅमिलीमध्ये युजर्सना 4 कनेक्शन मिळणार आहेत. म्हणजेच एकच प्लॅन 4 सिमला सपोर्ट करणार आहे. (फोटो सौजन्य – istockphoto)
कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. हा एक पोस्टपेड प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला चार कनेक्शन मिळणार आहे. ज्यामधील एक प्रायमरी सिम असणार आहे, आणि बाकी तीन फॅमिली कनेक्शन असणार आहे. तथापि, हा एक पोस्टपेड प्लॅन आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की, अंतिम बिलात जीएसटी वेगळा जोडला जाणार आहे. जीएसटीनंतर प्लॅनची किंमत थोडी वाढू शकते. त्यामुळे युजर्सना थोडे जास्त पैसे द्यावे लागू शकतात.
Tired of managing multiple plans?
BSNL ₹999 Family Plan Gives You 4 Connections, each with 75GB Data, Unlimited Calls & 100 SMS/day – All in One Pack!
Switch to BSNL’s ₹999 Postpaid Plan Now – Perfect for Families#BSNL #PostPaidPlan #BSNLPlan #DigitalIndia pic.twitter.com/4nnvIHCzqf
— BSNL India (@BSNLCorporate) July 18, 2025
बीएसएनएलच्या नवीन फॅमिली रिचार्ज प्लॅनमधील फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण चार कनेक्शन मिळणार आहेत, त्यासह, प्रत्येक कनेक्शनवर तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह 75 जीबी डेटा देखील दिला जाणार आहे. यासह, या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळेल. म्हणजेच हा प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये 225 जीबी पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदा देखील मिळत आहे.
जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त डेटा वापरला तर प्रति एमबी 1 पैसे दराने शुल्क आकारले जाणार आहे. तथापि, जर तुमच्या घरात जास्त कुटुंबातील सदस्य असतील, तर एकाच प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व फायदे मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळा रिचार्ज करण्याची गरज लागणार नाही. बीएसएनएल वेबसाइट, बीएसएनएल सेल्फ केअर अॅप किंवा बीएसएनएल टोल फ्री नंबर 1800-180-1503 द्वारे तुम्ही नवीन रिचार्ज प्लॅनचा फायदा घेऊ शकता.