Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

1199 रुपयांमध्ये मिळणार 365 दिवसांची व्हॅलिडीटी! BSNL युजर्ससाठी घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन

BSNL ने आपल्या ग्राहकांना एक अद्भुत भेट दिली आहे. BSNL च्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 1,199 रुपये आहे.या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षभरासाठी आहे. हा प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायदेशीर ठरू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 03, 2024 | 10:00 PM
1199 रुपयांमध्ये मिळणार 365 दिवसांची व्हॅलिडीटी! BSNL युजर्ससाठी घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन

1199 रुपयांमध्ये मिळणार 365 दिवसांची व्हॅलिडीटी! BSNL युजर्ससाठी घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या वाढत्या रिचार्ज प्लॅनच्या ट्रेंडमध्ये BSNL आजही आपल्या युजर्ससाठी स्वस्त, फायदेशीर आणि परवडणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत आहे. पैसे कमी मात्र फायदे अनेक असे BSNL चे रिचार्ज प्लॅन असतात. आपला हाच रेकॉर्ड कायम ठेवत आता BSNL ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. ज्यामध्ये कॉलिंग डेटा आणि एसएमएससारखे फायदे आहेत. हा रिचार्ज प्लॅन केवळ 1199 रुपयांमध्ये मिळणार असून त्याची व्हॅलिडीटी 365 दिवस म्हणजेच संपूर्ण वर्षासाठी असणार आहे.

हेदेखील वाचा- जगातल्या प्रत्येक कॅमेऱ्याचा चेहरा गोल, मग फोटो चौकोनी का? कारण वाचून चकीत व्हाल

BSNL च्या या नवीन प्लॅनची दररोजची किंमत फक्त 3.5 रुपये आणि महिन्याला 100 रुपये आहे. म्हणजेच हा प्लॅन तुम्ही 1199 रुपयांमध्ये वर्षभरासाठी खरेदी करू शकता. यामध्ये आणखी बरेच फायदे उपलब्ध आहेत जे या किमतीत प्लॅन सर्वोत्तम बनवतात. दिवाळीच्या मुहूर्तावर भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांना एक अद्भुत भेट दिली आहे. कंपनीने कमी किंमतीत व्हॅल्यू फॉर मनी प्रीपेड प्लॅन आणला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

BSNL च्या या किफायतशीर प्लॅनमध्ये केवळ कॉलिंगचेच फायदे उपलब्ध नाहीत तर, यामध्ये डेटा आणि एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. या प्लॅनची ​​किंमत 1199 रुपये आहे. याचा अर्थ, तुम्ही फक्त 3.50 रुपये प्रतिदिन खर्च करून सर्व फायदे घेऊ शकता. एकीकडे, इतर टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज खूप महाग आहेत, त्यामुळे वापरकर्त्यांना दिलासा देण्यासाठी BSNL ही योजना तयार करणार आहे. त्यात कोणते फायदे दिले जात आहेत आणि त्याची किंमत काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- पैसे खर्च न करता ठीक होणार आयफोनचा कॅमेरा, टेक जायंट Apple युजर्सना देतेय मोफत सेवा

BSNL चा परवडणारा प्लॅन

BSNL च्या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 1,199 रुपये आहे. हिशोब केला तर रोजचा खर्च अंदाजे 3.50 रुपये येतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवस आहे. ग्राहक एका वर्षासाठी 3GB हाय-स्पीड 3G/4G डेटा कोणत्याही अडचणीशिवाय वापरू शकतात. यामध्ये दररोज 100 मोफत एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे आणि फ्री कॉलिंग सारखे फायदे देखील यात उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये विनामूल्य राष्ट्रीय रोमिंग देखील आहे, जे हे सुनिश्चित करते की युजर्सना भारतात प्रवास करताना इनकमिंग कॉलसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.

चालू वर्षाच्या प्लॅनच्या किंमतीत कपात

BSNL ने आणखी 365 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत कमी केली आहे. हा प्लॅन सुरुवातीला 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता आणि आता हा प्लॅन 1,899 रुपयांमध्ये ऑफर केला जात आहे. यावर 100 रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र, BSNL युजर्स केवळ 7 नोव्हेंबर 2024 पर्यंतच या नवीन ऑफरचा फायदा घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 600GB डेटा आणि दररोज 100 मोफत एसएमएस यांचा समावेश आहे.

परवडणाऱ्या प्लॅनवर कंपनीचा भर

परवडणाऱ्या प्लॅनवर भर देऊन बीएसएनएल ग्राहकांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. कंपनी परवडणाऱ्या किमतीत दीर्घकालीन योजना देखील देत आहे. ज्यामुळे युजर्सचा फायदा होत आहे. तसेच इतर कंपन्यांचे युजर्स देखील त्यांचे सिम कार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत.

ही योजना कोणासाठी सर्वोत्तम?

हा रिचार्ज प्लॅन सेकेंडरी सिम म्हणून BSNL वापरणाऱ्या लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये, सिम सक्रिय ठेवण्यासाठी दरमहा 100 रुपयांपेक्षा कमी खर्च केला जातो आणि जवळजवळ सर्व फायदे देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कंपनीची 4G सेवाही काही ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

Web Title: Bsnl offers new recharge plan for users which has 365 days validity in just 1199 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 10:00 PM

Topics:  

  • annual recharge plan

संबंधित बातम्या

VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, किंमत वाचून तुमचेही होश उडतील
1

VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, किंमत वाचून तुमचेही होश उडतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.