Jio-Airtel'ची चिंता वाढली, BSNL 4G टॉवरसह 5G लाँच करण्यास सज्ज, युजर्सना मिळणार अनेक फायदे
येत्या काळात बीएसएनएल फार चर्चेत राहिले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवताच अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. वाढते युजर्स बघता कंपनी आपल्या सेवांमध्ये अनेक बदल घडवून आणत आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅननंतर आता कंपनी 4G सह 5G लाँच करण्यासाठीही सज्ज झाले आहे.
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपले नेटवर्क वेगाने अपग्रेड करण्यावर सातत्याने काम करत आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला सांगितले की, ते बीएसएनएलचा युजर बेस आणि सेवा सुधारण्यासाठी कंपनी कठोर परिश्रम घेत आहेत. कंपनीचे सध्याचे नेटवर्क पुढील सहा महिन्यांत पूर्णपणे बदलण्याची योजना आहे.
हेदेखील वाचा – Realme P1 Speed 5G: रियलमी घेऊन येत आहे स्वस्त गेमिंग स्मार्टफोन, लाँच डेट आणि फीचर्स जाणून घ्या
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्यांत त्यांची सेवा पूर्वीपेक्षा चांगली होईल. त्यांनी सांगितले की 4G टॉवरची संख्या 24 हजारांवरून 1 लाखांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनी ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत चांगल्या दूरसंचार सेवांसाठी स्वदेशी तंत्रज्ञानावर काम करत आहे.
संसदीय समितीसोबत झालेल्या या बैठकीत दूरसंचार सचिव नीरज मित्तल आणि बीएसएनएलचे सीएमडी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बीएसएनएलच्या 4G आणि 5G सेवांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बीएसएनएल युजर्सची घटती संख्या आणि कॉल ड्रॉपसारख्या समस्यांच्या वाढत्या तक्रारींबाबत संसदीय समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेदेखील वाचा – Samsung Galaxy A16 5G: 6 वर्ष चालणार, वारंवार फोन बदलण्याची झंझट संपणार
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनी आता सुमारे 54000 4G टॉवर्स उभारणीसाठी जवळजवळ तयार आहेत. यासोबतच कंपनीने अनेक साइटवर नेटवर्क अपग्रेडेशनचे काम जवळपास पूर्ण केले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी पुढील सहा महिन्यांत 100,000 4G टॉवर्स बसवण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासोबतच कंपनी अनेक साइट्सवर 5G नेटवर्कची टेस्टिंगदेखील करत आहे.
बीएसएनएलने कार्बन मोबाईलसोबत पार्टनरशिप केली आहे. कंपनी सतत आपले नेटवर्क अपग्रेड करण्याचे काम करत आहे. बीएसएनएलचे ग्राहक बहुतांशी ग्रामीण भागातील आहेत. यामुळेच कंपनीने कार्बन मोबाईलच्या सहकार्याने फीचर फोन लाँच करण्याची योजना आखली आहे. असे केल्याने कंपनीच्या ग्राहकांना 4G सेवेसाठी महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.