सध्याच्या या स्मार्टफोनच्या युगात गेमिंग स्मार्टफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकजण आता अधिकतर नवीन स्मार्टफोन घेताना गेमिंग स्मार्टफोनचा घेण्याचा विचार करतात. मात्र अधिकतर गेमिंग स्मार्टफोन हे सामान्य स्मार्टफोनपेक्षा अधिक किमतीला विकले जातात, ज्यामुळे अनेकांना इच्छा असूनही हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. मात्र आता चिंता करू नका कारण रियलमी लवकरच आपला सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन घेऊन येत आहे.
रियलमीने Realme P1 Speed 5G स्मार्टफोन लाँच केल्याची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 15 ऑक्टोबरला लाँच होईल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला P1 सिरीजचे दोन स्मार्टफोन Realme P1 आणि Realme P1 Pro लाँच केले होते. Realme P1 Speed 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300 Energy chipset सह लाँच केला जाईल. याबाबत कंपनीने सध्या कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
हेदेखील वाचा – Samsung Galaxy A16 5G: 6 वर्ष चालणार, वारंवार फोन बदलण्याची झंझट संपणार
रियलमीच्या स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये एक मोठा कॅमेरा मॉड्यूल प्रदान केला जाईल. हा फोन कंपनीच्या P1 सीरीज प्रमाणे अल्ट्रा स्लिम डिझाइनसह लाँच केला जाईल. या फोनच्या टीझर पोस्टरमध्ये असे दिसून आले आहे की फोनमध्ये उच्च स्क्रीन टू बॉडी रेशो असेल. या फोनमध्ये OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश 120Hz असेल.
Realme P1 Speed 5G हे कंपनीचे गेमिंग सेंट्रिक डिव्हाइस आहे. या फोनमध्ये दमदार गेमिंग एक्सपीरियंससाठी GT Mode उपलब्ध असेल. यासोबतच हा फोन बाजारात TUV SUD लॅग-फ्री मोबाइल गेमिंग सर्टिफिकेशनसह लाँच केला जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की, हा स्मार्टफोन 90fps गेमिंग सपोर्टसह येईल.
हेदेखील वाचा – या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या
रियलमीच्या आगामी असे सांगितले जात आहे की, हा 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करेल. यासोबतच व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असेल आणि 45W वायर्ड चार्जसाठी सपोर्ट असेल. Realme P1 Speed 5G फ्लिपकार्टवर विकले जाईल. सध्या फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.