Samsung चा नवीन स्मार्टफोन Galaxy A16 5G लाँचसाठी आता सज्ज झाला आहे. हा आगामी स्मार्टफोन Galaxy A16 5G लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. कंपनीचा दावा आहे की, फोनमध्ये 6 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्ससह 6 जनरेशन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील. म्हणजे तुम्हाला तुमचा फोन दरवर्षी बदलण्याची गरज नाही. युजर्स एकदा फोन खरेदी करू शकतात आणि 6 वर्षांसाठी वापरू शकतात.
Samsung ने Galaxy A16 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या A15 5G चा सक्सेसर म्हणून याला लाँच केले जाणार आहे. युरोपियन बाजारपेठेसाठी कंपनीने ते मिडरेंज श्रेणीत आणले आहे. फोनमध्ये नॉचसह मोठा 6.7-इंचाचा FHD+ 90Hz सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात आणखीन कोणते फीचर्स दिले जाणार आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या
या फोनला सर्वात खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याला मिळणारे OS अपडेट्स. कंपनीने फोनला 6 वर्षांपर्यंत OS अपडेट्स आणि 6 वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे. इतक्या वर्षात सॅमसंग सेक्युरिटी अपडेट देत असलेला हा पहिला मिडरेंज फोन आहे. हे One UI 6 सह Android 14 वर चालते.
हेदेखील वाचा – जिओने घेतला 5G नेटवर्कवर यू-टर्न, एअरटेलपप्रमाणे मारली पलटी, जाणून घ्या का परतले 4G’वर?
हा फोन मागील मॉडेलप्रमाणे 50MP मुख्य, 5MP अल्ट्रा-वाइड + 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा राखून ठेवतो. फोन 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. याचा चार्जर स्वतंत्रपणे खरेदी करावा लागेल.
Samsung Galaxy A16 5G मिडनाईट ब्लू, टर्क्वाइज आणि ग्रे कलर पर्यायांमध्ये येतो. 4GB + 128GB मॉडेलसाठी त्याची किंमत EUR 249 (USD 273 / रु 22,960 अंदाजे) आहे. येत्या काही दिवसांत तो भारतीय बाजारपेठेतही लाँच होणार आहे.