Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी
लग्जरी स्मार्टफोनचं नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर पहिलं नावं येतं Caviar. Caviar ही कंपनी लग्जरी स्मार्टफोन तयार करण्यासाठी ओळखली जाते. आता या कंपनीने iPhone 17 Pro लाइनअप चे स्पेशल विक्ट्री कलेक्शन लाँच केलं आहे. Caviar ने iPhone 17 Pro आणि 17 Pro Max स्मार्टफोनचे पाच मॉडेल्स सादर केले आहेत. ज्यामध्ये मॅग्मा, गोमेद, ओनिक्स, पोलार आणि अल्ट्रामरीन यांचा समावेश आहे. Caviar चं असं म्हणणं आहे की, कंपनी प्रत्येक मॉडेलचे सुमारे 19 युनिट्स सादर करणार आहे. येथे आम्ही तुम्हाला कॅविअरच्या खास आयफोन मॉडेलबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
Victory कलेक्शनवाले आयफोन मॉडलमध्ये Caviar ने फ्रेमसाठी एयरोस्पेस-ग्रेड टाइटेनियम किंवा रेनफोर्स स्टीलचा वापर केला आहे. Caviar ने या व्हेरिअंटला आणखी प्रिमियम लूक देण्यासाठी क्रोकोडाइल लेदर, काल्फस्किन आणि हर्म्स एप्सॉम लेदरचा वापर केला आहे. यासोबतच ड्यूरेबिलिटी आणि विजुअल डेप्थला आणखी चांगलं बनवण्यासाठी यामध्ये PVD कोटिंगचा वापर करण्यात आला आहे. Victory Magma मध्ये डीप ब्लॅक टाइटेनिमयसह चमकदार ऑरेंज एसेंट आणि क्रोकोडायल लेदरचा देखील वापर करण्यात आला आहे. या फोनचं डिझाईन वोल्कॅनिक एनर्जीने प्रेरित आहे. Victory Onyx मध्ये कंपनीने टाइटेनियमसह ब्लॅक काल्फस्किनचा देखील वापर केला आहे. (फोटो सौजन्य – Caviar)
Victory Polar बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये व्हाइट क्रोकोडायल लेदर आणि टाइटेनियम Guilloché डिटेलिंगचा वापर करण्यात आला आहे. Victory Adamant मध्ये कंपनीने PVD-कोटेड स्टीलसह Hermès लेदरचा वापर केला आहे. तर Victory Ultramarine मध्ये Caviar ने विविड ब्लू लेदरसह पॉलिश टाइटेनिमयचा वापर केला आहे. प्रत्येक मॉडेलला इंटरेक्टिव बॉक्ससह आणलं आहे. या फोनसोबत कलेक्टेबल कॉइन आणि 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड देखील ऑफर केलं जात आहे.
Caviar ने Victory Collection सीरीज आयफोन्सला 10,060 डॉलर म्हणजेच सुमारे 8,93,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केलं आहे. Victory Ultramarine मॉडल कंपनीचा सर्वात अफोर्डेबल मॉडल आहे. यासोबतच Victory Onyx आणि Victory Polar मॉडलला कंपनीने 10,200 डॉलर म्हणजेच सुमारे 9,06,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे.
Victory Adamant ला कंपनीने 10,490 डॉलर म्हणजेच सुमारे 9,31,317 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. Victory Magma ला कंपनीने 10,630 डॉलर म्हणजेच सुमारे 9,43,600 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. कंपनीने या प्रत्येक मॉडेलचे 19 युनिट्स सादर केले आहेत, जे Caviar च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑर्डर केले जाऊ शकतात.