Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत... 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज
Lava Bold N1 Lite लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. खरंतर या स्मार्टफोनची अधिकृत लाँच डेट अद्याप जाहिर करण्यात आली नाही. मात्र यापूर्वीच आता हा आगामी स्मार्टफोन कोणत्याही अधिकृत घोषणेपूर्वी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा आगामी स्मार्टफोन Lava Bold N1 सीरीजचे नवीन एडिशन असणार आहे, ज्यामध्ये सध्या Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro मॉडेल्सचा समावेश आहे.
Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स
Amazon वर Lava Bold N1 Lite लिस्टिंगवर पाहायला मिळत आहे. या आगामी स्मार्टफोनची किंमत 6,699 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, ई-कॉमर्स साइट सध्या त्यावर सवलत देत आहे आणि फोन 5,698 रुपयांच्या कमी किमतीत विकला जात आहे. स्मार्टफोनच्या लिस्टिंगनुसार, हा स्मार्टफोन दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल गोल्ड यांचा समावेश आहे. सध्या Amazon वर या स्मार्टफोनचा एकच व्हेरिअंट पाहायला मिळत आहे. दुसऱ्या कोणत्याही रॅम किंवा स्टोरेज व्हेरिअंटचा उल्लेख करण्यात आला नाही. (फोटो सौजन्य – X)
लिस्टिंगनुसार, Lava Bold N1 Lite मध्ये 6.75-इंच HD+ (720 x 1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन दिली जाणार आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 269 PPI पिक्सेल डेंसिटी मिळणार आहे. पॅनलमध्ये फ्रंट सेल्फी कॅमेरासाठी होल-पंच कटआउट असणार आहे. हँडसेटचे डायमेंशन 165.0 x 76.0 x 9.0mm असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचं वजन 193 ग्रॅम आहे. Lava Bold N1 Lite ला एक अनस्पेसिफाइड UniSoc ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लिस्ट करण्यात आलं आहे. यामध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. रॅमला वर्चुअली 6GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोन Android 15 वर आधारित आहे.
लिस्टिंगनुसार, फोटोग्राफी सेक्शनबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे, ज्यामध्ये 13-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि एक अनस्पेसिफाइड सेकेंडरी सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रं ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 1080p रेजोल्यूशनवर 30fps पर्यंत व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्टसह येतो.
सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकग्निशन सपोर्ट आहे. यामध्ये निनावी कॉल रेकॉर्डिंग फीचर देखील मिळणार आहे, जे स्मार्ट प्रोटेक्शन फीचर अंतर्गत सुरक्षित संभाषणासाठी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Lava Bold N1 Lite मध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हा फोन IP54 रेटिंगसह येतो, जो धूळ आणि हलक्या पाण्याच्या थेंबापासून संरक्षण प्रदान करते. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10W चार्जिंग सपोर्ट आहे.