
CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
CES 2026 मध्ये गुगलने घोषणा केली आहे की, जेमिनी एआयमुळे आता यूजर्सचा टिव्ही पाहण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. CES 2026 मध्ये गूगलने सांगितलं आहे की, कंपनी Google TV जेमिनिच्या वापरामुळे अधिक स्मार्ट होणार आहे. प्रोजेक्टर सारख्या अनेक ब्रँड आणि प्लॅटफॉर्मवर तुमच्या टीव्हीशी संवाद साधण्याचे अधिक मार्ग आणत आहे. CES 2026 मध्ये गूगल जेमिनीचे नवीन फीचर्स पाहायला मिळाले आहेत. हे फीचर गुगल टिव्हीसाठी रोलआऊट केले जाणार आहेत. याबाबत गूगलने ब्लॉगमध्ये अधिकृत घोषणा देखील केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या आवडत्या विषयांना एका नवीन, आकर्षक व्हिज्युअल फ्रेमवर्कद्वारे एक्सप्लोर करा जे तुमच्या प्रश्नाचे रूपांतर प्रतिमा, व्हिडिओ आणि रिअल-टाइम स्पोर्ट्स अपडेटसह जेमिनी रिस्पॉन्समध्ये बदलते. कठिण आणि गुंतागुंतीच्या विषयांसाठी ‘डीप डाइव’ संपूर्ण परिवारासाठी सरळ, इंटरॅक्टिव ओवरव्यू दाखवू शकतो. जेमिनीचा वापर करून तुम्ही गुगल फोटो लायब्रेरीमध्ये खास लोकं आणि खास क्षण सर्च करू शकणार आहात. फोटो रीमिक्ससह त्वरित क्रिएटिव शैलीमध्ये लागू केल्या जाऊ शकतात किंवा आठवणींना सिनेमॅटिक इमर्सिव्ह स्लाईड शोमध्ये बदलले जाऊ शकते. AI च्या मदतीने गुगल टिव्हीमध्ये पर्सनल व्हिडीओ किंवा फोटो सर्च केले जाऊ शकतात.
नॅनो बनाना आणि वीओचा वापर करून तुमचे वैयक्तिक फोटो एका वेगळ्या रुपात पाहू शकता किंवा थेट टिव्हीवर ओरिजिनल मीडिया तयार केली जाऊ शकते. तुमची सेटिंग्स ऑप्टिमाइज करण्यासाठी सोप्या भाषेचा वापर करून कठिन सेटिंग्स मेन्यूची गरज पडणार नाही. तुम्ही जर एखादा चित्रपट किंवा शो बघत असाल आणि तुम्हाला पिक्चर आणि साउंड एडजस्ट करायचा असेल तर तुम्हाला चित्रपट किंवा शो बंद करण्याची गरज नाही. तुम्ही जेमिनीला सांगू शकता की स्क्रीन खूप अस्पष्ट आहे किंवा संवाद ऐकू येत नाही आणि तुमच्या या समस्या गुगल जेमिनी वापरून काही सेकंदात दुरुस्त केल्या जाऊ शकतात. हे नवीन फीचर्स आणि अपडेट्स सर्वात आधी निवडक TCL डिवाइसेजवर आणि आगामी महिन्यांत गुगल टिव्ही डिव्हाईससाठी जारी केलं जाऊ शकतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुगल टीव्हीसाठी जेमिनी एआय सादर करण्यात आले होते आणि त्यानंतर गुगल सतत त्याच्या अपग्रेडवर काम करत आहे.
Ans: Google TV हा Android TV वर आधारित स्मार्ट टीव्ही प्लॅटफॉर्म आहे, जो विविध OTT अॅप्स, लाईव्ह टीव्ही आणि वैयक्तिक शिफारसी एकाच स्क्रीनवर देतो.
Ans: Android TV हा बेस सिस्टम आहे, तर Google TV मध्ये कंटेंट-केंद्रित इंटरफेस, पर्सनल रिकमंडेशन आणि Google सेवांचे अधिक चांगले इंटिग्रेशन मिळते.
Ans: Gemini AI मुळे स्मार्ट सर्च, व्हॉइस कमांड, कंटेंट सजेशन, प्रश्नोत्तरे आणि अधिक संवादात्मक अनुभव मिळतो.