सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान
वाढत्या तंत्रज्ञानाच्या जगात आपली अनेक कामात स्मार्टफोनवर अवलंबून असतात. यूपीआय आणि बँकिंगचे ॲप्स देखील स्मार्टफोनमध्येच आहेत आणि याद्वारे बहुतेकजण व्यवहार करतात. मात्र जर या ॲप्सचा ॲक्सेस हॅकर्सकडे गेला तर एक मोठा फ्रॉड होऊ शकतो. तुमचे सर्व पैसे तुमची सर्व माहिती हॅकर्स पर्यंत जाऊ शकते. अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षित राहावे यासाठी सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. जर तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल किंवा VoIP नंबरवरून कॉल आला किंवा मेसेज आला तर त्याला रिप्लाय देऊ नका त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या एडवाजरीमध्ये सरकारी एजेंसी I4C ने 4 नंबरबाबत लोकांना सतर्क केलं आहे. या नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेज तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
+92- हा पाकिस्तानचा आईएसडी कोड आहे. सायबर अपराधी आणि पाकिस्तानमध्ये बसलेले गुन्हेगार +92 पासून सुरु होणाऱ्या नंबरचा वापर करतात. या नंबरचा वापर करून सायबर गुन्हेगार तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा किंवा दुसऱ्या मेसेजिंग अॅपवर मेसेज पाठवू शकतात. या मेसेजमध्ये मालवेअर असू शकतो. जो तुमच्या फोनवर ताबा मिळवू शकतो.
+855– हा एक VoIP म्हणजेच वॉइस ओवर इंटरनेट प्रोटोकॉल नंबर आहे. यासा सोप्या भाषेत इंटरनेटद्वारे जनरेट करण्यात आलेला वर्चुअल नंबर असं देखील म्हटलं जातं. हा नंबर ट्रॅक करणं फार कठीण आहे. त्यामुळे सहसा या नंबरचा वापर लोकांची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो.
+86- या अंकांनी सुरु होणार नंबर देखील एक VoIP नंबर असतो, जो लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरला जातो.
+880- I4C ने दिलेल्या माहितीनुसार, हा सुद्धा एक इंटरनेटद्वारे जेनरेट करण्यात आलेला वर्चुअल नंबर आहे, ज्याचा वापर सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी करतात.






