फोटो सौजन्य - pinterest
AI आणि रोबोटच्या मदतीने आपण सगळं काही करू शकतो. अशी कोणतीही गोष्ट नाही, जी AI आणि रोबोटच्या करू शकत नाही. AI आणि रोबोट तुमच्यासोबत एखाद्या माणसाप्रमाणे संवाद साधू शकतो, रोबोट हॉटेलमध्ये काम करू शकतो, घरातील कामं करू शकतो, माणसाने दिलेल्या सर्व ऑर्डर्स फॉलो करू शकतो, प्रत्येक कामात आपली मदत करू शकतो, आपल्याला पाहिजे असलेली सर्व माहिती पुरवू शकतो, फोटो – व्हिडीओ एडीट करू शकतो.
हेदेखील वाचा- भरगोस डिस्काऊंट आणि ऑफर्ससह ‘या’ दिवशी सुरु होतोय Amazon Festival Sale!
असं कोणतंच कामं नाही जे AI आणि रोबोट करू शकत नाहीत. काही लोकं रोबोटना त्यांच्या घरी त्यांच्या साथीदार म्हणून ठेवतात. त्या रोबोटसोबतच जीवन जगतात. आता तर अशी एक घटना समोर आली आहे जिथे एका रोबोटच्या मदतीने रुग्णाचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. AI, मशीन लर्निंग आणि रोबोट्स यांसारख्या शब्दांशी आपण आधीपासूनच परिचित आहोत. ह्या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनत आहेत. सर्व क्षेत्रांसोबतच वैद्यकीय क्षेत्रात देखील AI, मशीन लर्निंग आणि रोबोट्सचा वापर वाढला आहे. याचं आता एक नवं उदाहरण समोर आलं आहे.
हेदेखील वाचा- बजेट किंमतीत Samsung Galaxy F14 5G भारतात लाँच! जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
चीनमध्ये डॉक्टरांनी 5000 किलोमीटर अंतरावरून रोबोटच्या मदतीने रुग्णाचं ऑपरेशन केल्याचं समोर आलं आहे. चीनमधील शंघाई चेस्ट हॉस्पिटलमधील डॉक्टराने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने रोबोटीक ऑपरेशन केलं आहे. त्यांनी पीडितेच्या फुफ्फुसातील ट्यूमर काढला आहे. डॉक्टर Luo Qingquan यांनी हे ऑपरेशन लीड केलं आहे. ऑपरेशनच्या वेळी, सर्जन शंघाईमध्ये होते, तर पीडित आणि सर्जिकल रोबोट काशगर, शिनजियांगमध्ये होते. दोन्ही भागांमध्ये 5000 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांना शिनजियांगमध्ये जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थितीत रोबोटीक ऑपरेशनची मदत घेण्यात आली.
चीनमधील हे पहिले रुग्णालय आहे ज्यामध्ये रोबोटच्या मदतीने छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेसोबतच शंघाई चेस्ट हॉस्पिटल रोबोटिक तंत्रज्ञानामध्ये संशोधन आणि विकास करत आहे. या ऑपरेशनबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, ऑपरेशनच्या वेळी, सर्जन शंघाईमध्ये होते, तर पीडित आणि सर्जिकल रोबोट काशगर, शिनजियांगमध्ये होते. दोन्ही भागांमध्ये 5000 किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे ऑपरेशनच्या वेळी डॉक्टरांना शिनजियांगमध्ये जाणं शक्य नव्हतं. सर्व परिस्थितीचा विचार करता रोबोटीक ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रोबोटीक ऑपरेशनच्या मदतीने पीडितेच्या फुफ्फुसातील ट्यूमर काढण्यात आला. चीनमधील हे पहिले रुग्णालय आहे ज्यामध्ये रोबोटच्या मदतीने छातीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे लोक भविष्यात ऑपरेशनसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याऐवजी रोबोटची मदत घेतील.
भारताकडेही अशी सर्जिकल रोबोट प्रणाली आहे, जी डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या SSI मंत्राने विकसित केली आहे. या रोबोटिक प्रणालीचा वापर करून डॉक्टरांना रुग्णाच्या जवळ न जाताही शस्त्रक्रिया करता येणार आहे. भारतीय सर्जिकल रोबोट एक मॉड्यूलर डिझाइन आहे. या ऑपरेशनसाठी, सर्जनला कन्सोल स्टेशनवर बसावे लागते, ज्यावर 32-इंच मॉनिटर स्थापित केला जातो आणि 3D टिव्ही उपलब्ध असते. त्यात सेफ्टी कॅमेरेही देण्यात आले आहेत, जे डॉक्टरांची उपस्थिती ओळखतात. भारतात 40 किलोमीटर अंतरावरून रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.