फोटो सौजन्य - pinterest
Amazon Great Freedom Festival Sale: सर्वांचा आवडता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वर लवकरच Amazon Great Freedom Festival Sale सुरु होणार आहे. तुम्ही नवीन फोन, कपडे, ॲक्सेसरिज किंवा होम अप्लायन्सेस खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये तुम्हाला फॅशन ब्रँडपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्व गोष्टींवर आकर्षक सूट मिळणार आहे. ग्राहकांना या सेलमधील प्रत्येक खरेदीवर बेस्ट डील आणि भरगोस डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. कंपनीने Amazon Great Freedom Festival Sale ची तारीख जाहीर केली आहे.
हेदेखील वाचा- अँड्रॉईड युजर्सना धोक्याची घंटा! सायबर सिक्युरिटी फर्मने जारी केला अलर्ट
Amazon च्या प्राईम मेंंमर्बसाठी हा सेल 5 ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच 6 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर उर्वरित Amazon युजर्ससाठी हा सेल 6 ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना बेस्ट डील, डिस्काउंटसह अनेक बँक ऑफर्सदेखील मिळणार आहेत. हा सेल 11 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
Amazon Great Freedom Festival Sale मध्ये खरेदी करणाऱ्या युजर्सना बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. जे युजर्स SBI बँकेची सेवा वापरतात आणि पेमेंटच्या वेळी SBI बँक कार्ड वापरतात, तर त्यांना 10 टक्के अतिरिक्त इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येणार आहे.
हेदेखील वाचा- देशातील 95 टक्के गावांमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध; 10 वर्षांत मोबाईल युजर्समध्ये प्रचंड वाढ
Amazon Great Freedom Festival Sale मध्ये स्मार्टफोन्सवर उत्तम ऑफर्स उपलब्ध होणार आहेत. 24 महिन्यांपर्यंत कोणत्याही खर्चाच्या ईएमआयशिवाय, 50 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफर, 5 हजार रुपयांपर्यंतची सूट देखील कूपनद्वारे ग्राहकांना स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. ज्या स्मार्टफोन्सवर तुम्हाला सवलत मिळेल त्यामध्ये OnePlus Nord CE4, OnePlus Nord CE4 Lite 5G, iQOO Z9 Lite 5G, OnePlus Nord 4 5G, iQOO 12 5G, Redmi 13 5G, Realme Narzo 70 Pro 5G, Realme Narzo 70, Realme 5G, 5G. Tecno Spark 20 Pro 5G, Samsung Galaxy M35 5G सारखे इतर मॉडेल देखील समाविष्ट आहेत.
Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना होम अप्लायन्सेसपासून ते इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत सर्व गोष्टींवर प्रचंड सूट मिळणार आहे. या सेलमध्ये युजर्सना स्मार्टवॉचवर 80 टक्के, हेडफोनवर 75 टक्के, टॅबलेटवर 60 टक्के आणि घरगुती उपकरणांवर 65 टक्क्यांपर्यत डिस्काऊंट मिळणार आहे.
Amazon Great Freedom Festival Sale मध्ये युजर्सना स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर भरगोस डिस्काऊंट मिळणार आहे. Amazon ऑफर्सवर 58% सवलतीत युजर्स सर्वोत्कृष्ट 65 इंच LED TV खरेदी करू शकता.