CMF ने लाँच केली अनोख्या डिझाईनवाली स्मार्टवॉच, ChatGPT चा अॅक्सेस आणि लेटेस्ट फीचर्सनी सुसज्ज; केवळ इतकी आहे किंमत
CMF Watch 3 Pro मंगळवारी निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. हे स्मार्टवॉच AI-सपोर्टेड हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सने सुसज्ज आहे. या वॉचमध्ये 1.43 इंच सर्कुलर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या स्मार्टवॉचमध्ये ChatGPT चा अॅक्सेस देखील देण्यात आला आहे. या वेअरेबलचा डेटा थर्ड पार्टी वेलनेस अॅप्ससह सिंक केला जाऊ शकतो. हे वॉच 3D अॅनिमेटेड वॉर्म-अप गाइड्स आणि गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइज देखील देते. CMF ने लाँच केलेले हे लेटेस्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंग, जेस्चर कंट्रोल आणि कस्टमाइजेबल वॉच फेस स्टूडियोला देखील सपोर्ट करते. यामध्ये मेटल मिडिल फ्रेम देण्यात आली आहे आणि IP68 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्डसह उपलब्ध आहे.
Smartphone Leaks: Google च्या अपकमिंग स्मार्टफोनचे फिचर्स लीक, अशी असणार डिझाईन… लाँच डेट जाणून घ्या
CMF Watch 3 Pro ची किंमत इटलीमध्ये EUR 99 म्हणजेच सुमारे 10,000 रुपये आहे. जपानमध्ये या वॉचची किंमत JPY 13,800 म्हणजेच सुमारे 8,100 रुपये आहे. हे CMF Watch 3 Pro वॉच डार्क ग्रे, लाइट ग्रे आणि ऑरेंज कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे स्मार्टवॉच भारतात कधी लाँच केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – X)
📢 Aa gaya CMF Watch 3 Pro — sasta bhi, smart bhi, full upgrade feel ke saath!
🔸1.43″ AMOLED
🔸Dual-band GPS, 131 sports modes
🔸Bluetooth calling + ChatGPT
🔸13-day battery, AI health coach
💰Intro price: ₹7999
🔥 Stylish, smart & budget king!#CMFWatch3Pro #Smartwatch pic.twitter.com/zbCayKsJdP — Shailendra Khare (@shail01khare) July 23, 2025
CMF Watch 3 Pro मध्ये 1.43 इंचाचा राउंड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 466×466 पिक्सेल आहे. हे वॉच 60Hz रिफ्रेश रेट आणि 670 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करते. हे वॉच 120 हून अधिक वॉच फेसला सपोर्ट करते, ज्यामधील अनेक फेस कस्टमाइज केले जाऊ शकते. यामध्ये चांगला हार्ट रेट मॉनिटरिंग आणि एडवांस्ड स्लीप सायकल ट्रॅकिंग देण्यात आली आहे. हे वॉच ब्लड ऑक्सीजन लेवल, स्ट्रेस लेवल आणि मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅक करते.
हे वॉच हे Nothing X अॅपशी सुसंगत आहे, जे यूजर्सना म्यूजिक प्लेबॅक, कॅमेरा शटर आणि फिटनेस अपडेट नियंत्रित करण्याची परवानगी देते. यात जेश्चर कंट्रोल फीचर देखील आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या मनगटाच्या मूवमेंटमुळे काही विशिष्ट क्रिया होतात. यात ब्लूटूथ कॉलिंग, ब्लूटूथ 5.3 आणि ड्युअल-बँड जीपीएस कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 3D अॅनिमेटेड वॉर्म-अप गाइड्स, गाइडेड ब्रीदिंग एक्सरसाइज आणि ChatGPT अॅक्सेस देखील उपलब्ध आहे. CMF Watch 3 Pro मध्ये 350mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी नियमित वापरात 13 दिवसांपर्यंत टिकू शकते. जास्त वापरात 10 दिवसांपर्यंत आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले चालू असताना सुमारे 4 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. हे वॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंगसह येते. त्याची बॉडी धातूपासून बनलेली आहे आणि त्यात लिक्विड सिलिकॉन स्ट्रॅप आहे.