
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी AI सुद्धा ऑन ड्युटी! दिल्ली पोलीस करणार स्मार्ट ग्लासेसचा वापर, अशी पटणार संशयितांची ओळख
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्मार्ट ग्लासेस फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेयर (FRS) आणि थर्मल इमेजिंग कॅपेबिलिटीजने सुसज्ज आहे. या स्मार्ट ग्लासेसच्या मदतीने पोलीस अधिकारी गर्दीच्या ठिकाणी लोकांना न थांबवता संशयितांची ओळख पटवू शकणार आहेत. हे डिव्हाईस इंडियन कंपनीने तयार केले आहे. 26 जानेवारी रोजी वापरले जाणारे स्मार्ट ग्लासेस थेट पोलीस डेटाबेसशी जोडले जाणार आहेत, ज्यामध्ये गुन्हेगार, घोषित गुन्हेगार आणि इतर संशयितांचे रेकॉर्ड असतात. यामुळे संशयितांची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
रिपोर्टनुसार, हे ग्लासेस पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या फोनसह मिळून काम करणार आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तिचा फेस स्कॅन करण्यासाठी या ग्लासेसचा वापर केला जाईल, तेव्हा सिस्टम डेटाबेसमध्ये साठवलेल्या रेकॉर्डसह चेहऱ्यावरील डेटा जुळवेल. यावेळी जर हिरव्या रंगाचा इंडिकेटर दिसला तर याचा अर्थ असा आहे की, संबंधित व्यक्तिचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. पण जर लाल रंगाचा इंडिकेटर दिसला तर याचा अर्थ असा आहे की, त्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यामुळे अधिकाऱ्यांना गरज पडल्यास त्वरित कारवाई करण्यास मदत होईल.
अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हे तंत्रज्ञान काही सेकंदात चेहरा स्कॅन करू शकते आणि आणि त्यामुळे शारीरिक तपासणीची गरज दूर होईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेड मार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात गर्दी नियंत्रित करण्यास मदत होईल. हे तंत्रज्ञान जुन्हा फोटोंची लाईव्ह ईमेजसोबत तुलना करून वर्षानुवर्षे एखाद्या व्यक्तीचे स्वरूप बदलत असले तरी देखील त्याची ओळख पटविण्यासाठी सक्षम आहे. फेशियल रिकग्निशनव्यतिरिक्त, स्मार्ट ग्लासेसमध्ये थर्मल इमेजिंग फीचर्स देखील समाविष्ट आहे, जे लपलेले मेटल ऑब्जेक्ट्स किंवा संभाव्य शस्त्रे शोधण्यास मदत करू शकते. हे तंत्रज्ञान सुरक्षेच्या एका अतिरिक्त स्थरावर काम करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, सब-इंस्पेक्टर आणि दूसरे फील्ड अधिकारी समारंभादरम्यान स्मार्ट ग्लासेसचा वापर करणार आहेत.