Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

Israel-Iran War: इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकन सैन्याने एआयचा वापर वेगाने हल्ले करण्यासाठी केला, ज्यामध्ये मावेन स्मार्ट सिस्टम आणि क्लाउड एआय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 07, 2026 | 03:44 PM
how ai is winning iran us war maven system claude ai updates

how ai is winning iran us war maven system claude ai updates

Follow Us
Close
Follow Us:
  • AI ठरले गेमचेंजर
  • खामेनींच्या मृत्यूत AI चा हात
  • नवे युद्धतंत्र

US AI attacks on Iran war 2026 : काळाच्या ओघात युद्धाचे स्वरूप बदलत गेले आहे, पण इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षाने (US-Israel Iran War) मानवी इतिहासातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. हे युद्ध आता केवळ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते ‘अल्गोरिदम’ आणि ‘डेटा’च्या जोरावर लढले जात आहे. इराणविरुद्धच्या युद्धाच्या पहिल्या २४ तासांत अमेरिकेने ज्या वेगाने १,००० लक्ष्यांवर बॉम्बहल्ला केला, त्यामागे अमेरिकन सैन्याचा मानवी मेंदू नसून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) ची ताकद होती.

मावेन स्मार्ट सिस्टम: अमेरिकेचे ‘डिजिटल’ शस्त्र

अमेरिकन सैन्याने या युद्धात ‘पॅलांटिर टेक्नॉलॉजीज’ (Palantir Technologies) द्वारे विकसित केलेल्या ‘मावेन स्मार्ट सिस्टम’ (Maven Smart System) चा प्रभावी वापर केला आहे. हे केवळ एक सॉफ्टवेअर नाही, तर एक महाकाय डेटा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म हजारो मैल वरून फिरणाऱ्या उपग्रहांकडून, ड्रोनकडून आणि जमिनीवरील गुप्तहेरांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवघ्या काही मिलिसेकंदात प्रक्रिया करते. पूर्वी ज्या लक्ष्याला शोधण्यासाठी मानवी विश्लेषकांना कित्येक तास लागायचे, ते काम आता मावेन सिस्टिम काही सेकंदात करते. या प्रणालीने इराणच्या लष्करी तळांना अशा प्रकारे ‘प्राधान्य’ (Priority) दिले की, अमेरिकन कमांडर्सना फक्त ‘बटण’ दाबण्याचे काम उरले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता

क्लॉड एआय आणि अचूकतेचा कळस

या मोहिमेत ‘अँथ्रोपिक’ (Anthropic) कंपनीचे जनरेटिव्ह एआय मॉडेल ‘क्लॉड’ (Claude) याने महत्त्वाची भूमिका बजावली. मावेन सिस्टिमने माहिती गोळा केली, पण त्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम क्लॉडने केले. शत्रूचे कोणते केंद्र सर्वात महत्त्वाचे आहे, कोठे हल्ला केल्यावर इराणची शक्ती सर्वात जास्त क्षीण होईल, याचे धोरणात्मक निर्णय एआयने घेतले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची अचूक वेळ देखील एआय मॉडेलनेच निश्चित केली होती. हल्ला झाल्यानंतरही, त्या हल्ल्याने किती नुकसान झाले याचे मूल्यांकन (Battle Damage Assessment) क्लॉड एआयने त्वरित करून दिले, ज्यामुळे सैन्याला त्यांची पुढची रणनीती ठरवणे सोपे झाले.

To strike 1,000 targets in 24 hours in Iran, the U.S. military leveraged the most advanced AI it’s ever used in warfare. Anthropic’s Claude partnered with the military’s Maven Smart System, suggesting targets and issuing precise location coordinates. https://t.co/dDQ8KoWdVT pic.twitter.com/EcFoJ0NOAy — The Washington Post (@washingtonpost) March 5, 2026

credit – social media and Twitter

सैनिक कमी, अल्गोरिदम जास्त!

अहवालांनुसार, मे २०२५ पर्यंत सुमारे २०,००० अमेरिकन सैनिक या एआय प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. मात्र, इराणविरुद्धच्या या आठ दिवसांच्या युद्धात हा आकडा कित्येक पटीने वाढला आहे. एआयवरील अवलंबित्व इतके वाढले आहे की, जर तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांच्या प्रमुखांनी (उदा. डारियो अमोदेई) हे तंत्रज्ञान थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी अमेरिकन सरकार आणि पेंटागॉन त्याचा वापर करणे सोडणार नाही, इतके ते या यंत्रणेच्या आहारी गेले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी

युद्धनीतीचे भविष्य आणि भीती

एआयमुळे युद्धाची गती इतकी वाढली आहे की इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळच मिळत नाहीये. जेव्हा मानवी विचार संपतात, तिथून एआयची प्रक्रिया सुरू होते. मात्र, या तंत्रज्ञानामुळे भविष्यात ‘ऑटोनॉमस किलिंग मशीन्स’ (स्वतःहून हत्या करणारी यंत्रे) निर्माण होण्याचा धोकाही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तरीही, सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेसाठी एआय हे इराणविरुद्धचे सर्वात मोठे आणि खात्रीशीर शस्त्र ठरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'मावेन स्मार्ट सिस्टम' अमेरिकन सैन्याला कशी मदत करते?

    Ans: ही प्रणाली उपग्रह आणि पाळत ठेवणाऱ्या उपकरणांकडून मिळणाऱ्या प्रचंड डेटावर रिअल-टाइम प्रक्रिया करते, शत्रूची लक्ष्ये ओळखते आणि हल्ल्याची अचूक वेळ कमांडर्सना सुचवते.

  • Que: या युद्धात 'क्लॉड एआय' (Claude AI) ची भूमिका काय आहे?

    Ans: क्लॉड एआय बुद्धिमत्तेचे विश्लेषण करते, लक्ष्यांची त्यांच्या धोरणात्मक महत्त्वानुसार क्रमवारी लावते आणि हल्ल्यानंतर झालेल्या हानीचे मूल्यांकन करते.

  • Que: एआयमुळे युद्धाच्या गतीवर काय परिणाम झाला आहे?

    Ans: एआयमुळे मानवी निर्णयाचा वेळ वाचला असून, अमेरिकेने पहिल्या २४ तासांत १,००० लक्ष्यांवर हल्ले करण्याची अभूतपूर्व गती गाठली आहे, ज्यामुळे शत्रूला सावरायला वेळ मिळत नाही.

Web Title: How ai is winning iran us war maven system claude ai updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • America
  • Artificial intelligence
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Hormuz ची सामुद्रधुनी बंद झाल्यास जगात हाहाकार! Trump यांच्या अमेरिकेलाही बसणार मोठा फटका, धाकधूक वाढली…
1

Hormuz ची सामुद्रधुनी बंद झाल्यास जगात हाहाकार! Trump यांच्या अमेरिकेलाही बसणार मोठा फटका, धाकधूक वाढली…

Oil Politics : युद्धाच्या आगीत महासत्तांची ‘आफ्रिका वारी’! अमेरिका रेड सीमध्ये सक्रिय; तर चीनने टाकला 348 अब्ज डॉलर्सचा फास
2

Oil Politics : युद्धाच्या आगीत महासत्तांची ‘आफ्रिका वारी’! अमेरिका रेड सीमध्ये सक्रिय; तर चीनने टाकला 348 अब्ज डॉलर्सचा फास

Maduro Bet: युद्धाच्या नावावर नफेखोरी! अमेरिकन जवानाने देशाची गुपिते ‘पॉलीमार्केट’वर लावली पणाला; मादुरो छाप्याचा ‘असा’ झाला सौदा
3

Maduro Bet: युद्धाच्या नावावर नफेखोरी! अमेरिकन जवानाने देशाची गुपिते ‘पॉलीमार्केट’वर लावली पणाला; मादुरो छाप्याचा ‘असा’ झाला सौदा

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील
4

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.