BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत
Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम
फोनची डिझाईन अगदी ब्लॅकबेरी किबोर्ड फोन सारखी आहे. हा स्मार्टफोन कासकरून अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे दोन फोनचा वापर करतात. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 499 डॉलर म्हणजेच सुमारे 41,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. यामध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. हे असे फीचर्स आहेत, जे सध्याच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध नसतात. चला तर मग या खास स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Clicks builds phones now. Introducing the Clicks Communicator… Reserve today at https://t.co/atGOv4UblV! pic.twitter.com/63GTpUKd5g — Clicks (@clickskeyboard) January 2, 2026
Clicks Communicator एक सेकेंड फोनच्या स्वरुपात डिझाईन करण्यात आला आहे. म्हणजेच जे लोकं दोन फोनचा वापर करतात, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा फोन डिझाईन करण्यात आला आहे. या फोनमध्ये फेसबूक, इंस्टाग्राम किंवा गेमसारखे अॅडॅक्टिव्ह अॅप्स उपलब्ध नाहीत. याऐवजी या फोनमध्ये महत्त्वाच्या कामांसाठी अॅप्स दिले जाणार आहेत. जसे, जीमेल, टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि स्लॅक. अशा परिस्थितीत हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे, ज्यांना जास्तीचे मेसेजिंग, ईमेल किंवा डॉक्यूमेंटवर काम करावे लागते. या फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड दिला जाणार आहे. ज्यामुळे टायपिंग अधिक अचूक आणि फास्ट होते. याशिवाय कीबोर्ड फिजिकल असल्याने, व्हर्च्युअल कीबोर्ड स्क्रीनवर जास्त जागा व्यापणार नाही.
या फोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. या फोनचे एक खास फीचर म्हणजे सिग्नल लाइट. हे फीचर फोनच्या बाजूला आहे आणि याच्या आजूबाजूला लाईट देण्यात आली आहे. हे फीचर यूजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकणार आहेत. या बटणाच्या लाईटमुळे, यूजर कोणाकडून संदेश किंवा सूचना कधी प्राप्त करत आहेत हे समजू शकतील. या बटणचे नाव प्रॉम्प्ट की असणार आहे आणि हे बटण प्रेस करून व्हॉईस मेसेज पाठवला जाऊ शकतो आणि यासोबतच नोट्स देखील तयार केले जाऊ शकतात.
Communicator नावाच्या या फोनमध्ये अनेक जुन्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे जे उपयुक्त असूनही हटविण्यात आले होते. जसे की, या फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, फिजिकल सिम ट्रे, 2TB पर्यंत माइक्रोएसडी कार्डचा सपोर्ट आणि एयरप्लेन मोडसाठी फिजिकल स्विच देण्यात आला आहे. याशिवाय फोन 4,000 mAh बॅटरी, 50MP मेन कॅमेरा 256GB स्टोरेज, अँड्रॉयड 16 ओएस आणि 5 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्ससह लाँच करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, यूजर फोनचा मागील पॅनल स्वतः बदलू शकतील. तात्काळ खरेदी करणाऱ्यांसाठी फोनची किंमत $399 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये असेल, तर नियमित यूजर्सना तो 499 डॉलरमध्ये मिळेल.






