मोबाईलचा बॉक्स फेकून देताय तर होईल मोठा फ्रॉड (फोटो सौजन्य- pinterest)
आपण फोन खरेदी केला की त्या फोनच्या बॉक्समध्ये आपल्याला फोनशी संबंधित काही वस्तू मिळतात. जसे की फोनचा चार्जर, सिमकार्ड पिन, वॉरंटी कार्ड, गाईड कार्ड आणि बरंच काही. 2 ते 3 वर्षे फोनचा वापर केल्यानंतर आपण हा फोनचा बॉक्स फेकून देतो. पण फोनचा बॉक्स फेकणं आपल्याला महागत पडू शकतं. जुन्या फोनच्या बॉक्सचा वापर करून आपली फसवणूक होऊ शकते आपल्यासोबत मोठा फ्रॉड देखील होऊ शकतो.
हेदेखील वाचा- तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढा DSLR सारखा भारी फोटो, फॉलो करा काही सोप्या स्टेप्स
अनेकांना फोनच्या बॉक्सचे महत्त्व माहित नसते, त्यामुळे 2 ते 3 वर्षे फोनचा वापर केल्यानंतर आपण फोनचा बॉक्स फेकून देतो. पण फोनचा बॉक्स रद्दी नसून हा बॉक्स आपल्याला भविष्यात खूप उपयोगी पडू शकते. तुम्हीही स्मार्टफोनचा बॉक्स फेकून देत असाल तर असे करू नका. स्मार्टफोन बॉक्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण या बॉक्सला खूप महत्त्व आहे. तुम्ही जुन्या फोनचा असा बॉक्स फेकत असाल जो चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तर त्या बॉक्सचा पुर्नवापर करून त्यामधून इतर फोनची विक्री केली जाण्याची शक्यता असते.
सहसा हल्ली लोकं ऑनलाईन सामान मागवतात, ज्यामध्ये काहीजण मोबाईल, हेडफोन्ससारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील मागवतात. पण तुम्ही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील ज्यामध्ये ऑनलाईन फोन ऑर्डर केल्यानंतर फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सहसा अशा बॉक्सचा वापर केला जातो, जो चांगल्या कंडिशनमध्ये असेल. फ्रॉड सेलर लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मोबाईलच्या बॉक्सचा वापर करणं, अशक्य आहे. यामुळे फ्रॉड सेलर लोकांनी फेकून दिलेल्या अशा बॉक्सचा वापर करतात, जे चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि बॉक्स पाहिल्यावर लोकांना फसवणुकीचा संशय देखील येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही मोबाईलचा जुना बॉक्स फेकत असाल तर काळजी घ्या. यामुळे तुमच्यासह इतरांचे देखील नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा- Google Gemini AI: ‘या’ युजर्सना Gmail वर मिळणार गुगलच्या Gemini AI ची मोफत सुविधा!
यशिवाय, बॉक्सवर अनेकदा सीरियल नंबर आणि IMEI क्रमांक सारखी माहिती असते. ही माहिती वॉरंटी दावे किंवा दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरू शकते. पण जर तुम्ही तुमच्या फोनचा बॉक्सचं फेकून दिला, तर वॉरंटीचा दावा करण्यासाठी इतर कागदपत्रे शोधावे लागतील. तुम्ही भविष्यात तुमचा फोन विकण्याचा निर्णय घेतल्यास, मूळ बॉक्स असल्यास त्याची पुनर्विक्री किंमत वाढते.
खरेदीदार सहसा मूळ पॅकेजिंगसह उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. तुम्ही जर बॉक्ससह तुमच्या जुन्या फोनची विक्री करायला गेलात तर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनची चांगली किंमत मिळु शकेल. बॉक्ससह फोनची विक्री केल्यास असे दिसून येते की फोन फार जुना नाही आणि तो व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. फोनसोबत मिळालेल्या ॲक्सेसरीज जर तुम्ही वापरात नसाल तर तुम्ही त्या सुरक्षितपणे मोबाईलच्या बॉक्समध्ये ठेवू शकता. याशिवाय, तुम्ही तुमचा जुना फोनही त्यात ठेवू शकता, जेणेकरून धूळ, ओरखडे आणि इतर नुकसानांपासून त्याचं संरक्षण होईल.