तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढा DSLR सारखा भारी फोटो (फोटो सौजन्य- pinterest)
हल्ली लोकं DSLR पेक्षा स्मार्टफोनने फोटो काढणं जास्त पसंत करतात. कारण आपण DSLR कॅमेरा सर्वत्र घेऊन फिरू शकत नाही, पण आपला स्मार्टफोन सतत आपल्यासोबत असतो. आणि स्मार्टफोनने फोटो काढणं देखील अगदी सोपं आहे. आपण DSLR पेक्षा आपल्या स्मार्टफोनने लवकर फोटो काढू शकता. हल्ली अनेक टेक कंपन्या त्यांच्या मोबाईलमध्ये DSLR सारखा कॅमेरा देत आहेत, ज्यामुळे युजर्सना फोटो काढणं अगदी सोपं होऊ शकेल. कारण लोकं फोन खरेदी करताना सर्वात आधी त्या फोनचा कॅमेरा तपासतात, जर फोनची कॅमेरा क्वालिटीच चांगली नसेल, तर फोन घेऊन काय फायदा?
हेदेखील वाचा- तब्बल 10 वर्षांनी Google बंद करतोय Chromecast स्ट्रीमिंग डिवाइसचं उत्पादन!
अनेक लोकं तर फक्त फोटोग्राफीसाठी फोन खरेदी करतात. DSLR पेक्षा फोनची किंमत कमी असते, शिवाय आपल्याला फोनमध्ये अनेक फायदे मिळतात, जे DSLR मध्ये मिळू शकत नाहीत. त्यामुळे विविध फायदे आणि उत्तम फोटोग्राफीसाठी लोकं स्मार्टफोन्सलाच प्राधान्य देतात. पण फोनचा कॅमेरा किती चांगल्या दर्जाचा असला तरी देखील आपण त्यामध्ये DSLR सारखे फोटो काढू शकत नाही, असं काहींना वाटतं. पण आपल्या फोनमध्ये DSLR सारखे फोटो काढणं अगदी सोपं आहे, यासाठी आपल्याला महागड्या फोन किंवा कॅमेऱ्याची गरज नसून काही टीप्सची गरज आहे, ज्या टीप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सोप्या टीप्सच्या मदतीने तुम्ही DSLR सारखे भारी फोटो तुमच्या स्मार्टफोनमध्येच काढू शकता.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये DSLR सारखा फोटो काढण्यासाठी काही टीप्स फॉलो करा-
स्मार्टफोनने फोटो काढताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकाशाचा योग्य वापर करणे. नैसर्गिक प्रकाशात फोटोची क्वालिटी चांगली राहते त्यामुळे स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी नैसर्गिक प्रकाश असणे महत्त्वाचे आहे. कमी प्रकाशात फोटो काढताना तुम्ही स्मार्टफोनच्या फ्लॅशऐवजी मोठ्या लाईटचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या फोटोमधील क्वालिटी चांगली दिसू शकेल.
स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी त्याची लेन्स साफ करावी. लेन्स स्वच्छ असल्यास फोटो अगदी स्पष्ट आणि चांगला येतो. स्मार्टफोनची लेन्स स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करावा. याशिवाय स्मार्टफोनने फोटो काढण्यापूर्वी ग्रिडलाइनचा वापर करावा. ग्रिडलाइन्सच्या वापरामुळे फोटो खूप छान दिसतो. तसेट स्मार्टफोन कॅमेऱ्याने फोटो काढण्यापूर्वी, एक्सपोजर मॅन्युअली सेट करणं गरजेचं आहे. एक्सपोजर मॅन्युअली सेट केल्यामुळे तुमच्या फोनला एक चांगली क्वालिटी मिळेल.
हेदेखील वाचा- vivo V40 आणि V40 Pro ची आज होणार धमाकेदार एंट्री! जबरदस्त कॅमेऱ्यासह मिळणार भन्नाट फीचर्स
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधून फोटो काढण्यासाठी अनेक एडिटिंग ॲप्स देखील वापरू शकता. हे ॲप्स तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळतील. या एडिटिंग ॲप्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन आणि शार्पनेस यासारखे घटक सेट करू शकता. ज्यामुळे तुमच्या फोनला एक वेगळा लूक मिळू शकतो.
यास्मार्टफोनमध्ये चांगले फोटो काढण्यासाठी अनेक मोड्सचा वापर करा. स्मार्टफोनमध्ये अनेक वेगवेगळे मोड दिले जातात ज्याच्या मदतीने तुम्ही जबरदस्त HD फोटो काढू शकता. या मोड्समध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट मोड असे बरेच वेगवेगळे पर्याय असतात.