Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे 6 लाख मोबाईल क्रमांक होणार बंद, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर

देशातील 6.80 लाख मोबाईल नंबरवर संकट ओढावले असून दूरसंचार विभागाकडून सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनचं रि वेरिफिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहे. यामध्ये तुमचा तर नंबर नाही ना?

  • By श्वेता झगडे
Updated On: May 24, 2024 | 01:04 PM
मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे 6 लाख मोबाईल क्रमांक होणार बंद, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर
Follow Us
Follow Us:

मोबाईल ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा यांसारखा आता मोबाईल ही अत्यावश्यक गरज बनली. मोबाईलचा वापर आपण अनेक कामासाठी करत असतो. एका सर्व्हेक्षणानुसार भारतात लोक रोज चार तास मोबाईलवर घालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. असे असताना देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहे. कारण केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून देण्याता आलेल्या सूचनेनुसार देशातील 6 लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार आहे.

नेमकं कारण काय?

दूरसंचार विभागाने (DoT) मोबाइल कंपन्यांना सुमारे 6 लाख 80 हजार मोबाइल कनेक्शनची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले आहे. कारण हे कनेक्शन चुकीच्या, बनावट किंवा बनावट ओळख आणि पत्त्याच्या कागदपत्रांच्या आधारे घेतले असल्याची माहिती मिळत आहे. दूरसंचार विभागाने मोबाईल कंपन्यांना तपासासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. 60 दिवसांच्या आत कंपन्यांनी पुन्हा पडताळणी न केल्यास हे संशयास्पद मोबाइल क्रमांक ब्लॉक केले जातील, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.

[read_also content=”गृहिणींचं बजेट कोलमडणार! कोथिंबीर, शेपू महागली; पाहा काय आहेत सध्याचे दर? https://www.navarashtra.com/maharashtra/vegetable-price-hike-in-maharashtra-and-coriander-shepu-rates-increased-537616.html”]

बनावट कागदपत्राद्वारे नंबर घेतल्याचा संशय

दूरसंचार विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे पडताळणी केल्यानंतर अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन्स संभाव्य फसव्या क्रमांक म्हणून ओळखले आहेत. हे असे कनेक्शन आहेत जे खोट्या किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवल्या गेल्याचा संशय आहे.

दूरसंचार विभागाने दिली दोन महिन्यांची मुदत

दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना 60 दिवसांच्या आत ओळखलेल्या मोबाईल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “दूरसंचार विभागाने अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन्स ओळखले आहेत. ओळखीचा पुरावा आणि पत्ता प्रमाणपत्र यांसारख्या बेकायदेशीर, खोट्या आणि बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर करून ही कनेक्शन मिळवल्याचा संशय आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

काय होणार कारवाई?

दूरसंचार विभागाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना या चिन्हांकित मोबाइल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. सर्व दूरसंचार कंपन्यांना ६० दिवसांच्या आत ओळखलेल्या कनेक्शनची पुन्हा पडताळणी करणे बंधनकारक आहे. पुन्हा पडताळणीमध्ये कनेक्शन अयशस्वी झाल्यास ते बंद केले जाईल.

या एप्रिलमध्ये दूरसंचार विभागाने अनेक हजार कनेक्शन बंद केले होते. दूरसंचार विभागाने एप्रिलमध्ये पुन्हा पडताळणीसाठी 10,834 संशयास्पद मोबाइल क्रमांक ओळखले होते आणि यापैकी 8272 मोबाइल कनेक्शन पुनर्पडताळणी अयशस्वी झाल्यामुळे बंद करण्यात आले होते. चुकीच्या किंवा बनावट केवायसी दस्तऐवजांचा वापर सूचित करते की हे मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीने प्राप्त केले गेले आहेत.

Web Title: Dot aims to disconnect over 6 lakh mobile connections obtained using fake documents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 01:03 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.