मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स (फोटो सौजन्य - pinterest)
गणेश चतुर्थी हा भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. हा दरवर्षी मुख्यतः देशाच्या दक्षिणेकडील भागात, विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रीगणेशाचा जन्म दुपारी झाला असे मानले जाते, त्यामुळेच दुपारी गणेशपूजनाची परंपरा आहे. यंदा हा दहा दिवसांचा महोत्सव 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून 17 सप्टेंबर रोजी संपणार आहे. गणेशोत्सवाच्या या विशेष दिवशी लोकांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह क्रिएटिव्ह स्टिकर्स शेअर करायला आवडतात. . आज WhatsApp चा वापर संवादासाठी सर्वाधिक होत असल्याने लोक WhatsApp वरून स्टिकर्स आणि GIF पाठवून आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतात.
हेदेखिल वाचा –AI धोकादायक आहे? ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा
तुम्ही WhatsApp वर तुमच्या मित्रांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक GIF, डूडल, स्टिकर्स आणि इतर ॲनिमेटेड स्टिकर्स शेअर करू शकता. तुम्हाला गणेश चतुर्थी 2024 ला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही थर्ड पार्टी WhatsApp स्टिकर ॲप्सद्वारे स्टिकर्स पाठवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
हेदेखिल वाचा –Dolly Chaiwala ची कमाई वाचून बसेल धक्का! एका ईव्हेंटसाठी घेतो तब्बल इतके पैसे
WhatsApp च्या GIF फीचरचा ट्रेंड झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण चॅटवर GIF फीचरचा वापर करतो. GIF फीचर सुरू झाल्यापासून यूजर्सना चॅटचा उत्तम अनुभव मिळत आहे. गणेशोत्सवाची थीम असलेली GIF कशी पाठवायची हे जाणून घ्या.
या व्यतिरिक्त, युजर्स गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी, फोटो शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी Canva आणि Pixabay ची मदत देखील घेऊ शकतात. वापरकर्ते विनामूल्य ऑनलाइन फोटो डाउनलोड करू शकतात.