Dolly Chaiwala ची कमाई वाचून बसेल धक्का! एका ईव्हेंटसाठी घेतो तब्बल इतके पैसे (फोटो सौजन्य - Dolly Chaiwala Instagram)
डॉली चायवाला नावाने प्रसिद्ध असलेला इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर गेल्या काही महिन्यांत खूप लोकप्रिय झाला आहे. सुनील पाटील असं त्याचं खरं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये डॉली चायवाला बिल गेट्स यांना चहा देताना दिसला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यानंतर एक सामान्य चहा विक्रेता हिरो बनला. त्याचे इंस्टाग्रामवर 4.2 मिलीयन फॉलोवर्स आहेत. त्याच्या व्हिडीओला लाखो व्हुज आणि लाईक्स मिळत आहेत.
हेदेखील वाचा- X Edit Feature: X वर युजर्सना मिळणार चुका सुधारण्याची संधी, Elon Musk ने लाँच केलं मॅसेज एडीट फीचर!
इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली चायवाल्याची कमाई वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. एखाद्या डॉक्टर किंवा इंजिनिअरच्या महिन्याच्या कमाईपेक्षा डॉली चायवाला अधिक कमाई करतो. डॉली चायवाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किती पैसे घेईल याचा अंदाज लावू शकता का? अलीकडेच एका कुवेत फूड व्लॉगरने डॉली चायवालाबद्दल काही मनोरंजक माहिती शेअर केली आहे. कुवेत फूड व्लॉगरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तो डॉलीला एका कार्यक्रमात आमंत्रित करण्याचा त्याचा अनुभव सांगताना दिसत आहे.
इंस्टाग्राम अकाऊंट akfoodvlogg वर कुवेत पॉडकास्टर तैयब फखरुद्धनने डॉली चायवालाबद्दल अनेक दावे केले आहेत. त्याने सांगितलं आहे की, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर डॉली चायवाला याला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करायचे असेल तर सर्वात आधी त्याच्या व्यवस्थापकाशी बोलणे आवश्यक आहे. डॉली चायवाला एका ईव्हेंटसाठी तब्बल 5 लाख रुपये फी घेतो, असा दावा कुवेत पॉडकास्टर तैयब फखरुद्धनने केला आहे. इतकंच नाही डॉली चायवाला स्वत:साठी आणि टीमसाठी नेहमी फाइव स्टार हॉटेलची मागणी करतो.
तैयब फखरुद्धनने सांगितलेला अनुभव ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. डॉली चायवालाची एका ईव्हेंटची कमाई एखाद्या डॉक्टर आणि इंजिनिअरच्या महिन्याच्या कमाईपेक्षा कमी नाही. इंस्टाग्राम अकाऊंट akfoodvlogg वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला दोन दिवसांत ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम युजर्स या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की डॉली चायवाला एका दिवसात जितकी कमाई करते ती आज डॉक्टर आणि इंजिनियर एका महिन्यात जितकी कमाई करते त्यापेक्षा जास्त आहे.
हेदेखील वाचा- AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! ‘या’ सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
महाराष्ट्रातील नागपूर शहरात डॉली चायवालाची आगळी-वेगळी ओळख आहे. त्याने दहावीनंतर शिक्षण सोडले आणि गेल्या १६ वर्षांपासून त्याचे नागपुरातील सिव्हिल लाईन्सजवळ चहाचे दुकान आहे. डॉली चहाच्या स्टॉलवर जो कोणी चहा प्यायला येतो त्याला डॉली चायवाल्याच्या स्टाईलची आणि चहाची भुरळ पडते. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि माजी सीईओ बिल गेट्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ते डॉली चायवाला या चहाचा आस्वाद घेताना दिसत होते.