Jio आणि Disney+ Hotstar साठी JioHotstar डोमेनचा मार्ग मोकळा? जैनम आणि जीविका मोफत डोमेन देण्यास तयार!
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं JioHotstar डोमेन आता लवकरच Jio आणि Disney+ Hotstar साठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे डोमेन कंपन्यांना मोफत दिलं जाऊ शकतं. कारण JioHotstar डोमेनचे मालक असलेले जैनम आणि जीविका यांनी अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता Jio आणि Disney+ Hotstar साठी JioHotstar डोमेनचा मार्ग मोकळा झाला असून कंपन्या लवकरच त्यांच्या या नवीन डोमेनची घोषणा करू शकतात.
हेदेखील वाचा- JioHotstar डोमेन मध्ये नवा ट्विस्ट, UAE भाऊ-बहीणने केला मालक असल्याचा दावा; खरा मालक नक्की कोण?
काही दिवसांपूर्वीच दुबईस्थित भावंड जैनम आणि जीविका यांनी JioHotstar डोमेन खरेदी केले होते. दिल्लीतील एका ॲप डेव्हलपरने या डोमेनवर दावा करत, ते विकण्यासाठी रिलायन्सकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यानंतर दुबईस्थित भावंड जैनम आणि जीविका यांनी हे डोमेन खरेदी केली आणि ते दोघे या डोमेनचे खरे मालक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर जैनम आणि जीविका JioHotstar डोमेन रिलायन्सला विकणार की नाही, याबाबत अशी चर्चा सुरु होती. आता या भावंडांनी JioHotstar डोमेन रिलायन्सला मोफत ऑफर केलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडलेलं डोमेन आता लवकरच रिलायन्सला मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
जैनम आणि जीविका यांनी सांगितलं आहे की, जर टीम रिलायन्सला हे डोमेन त्यांच्यासाठी चांगले ठरू शकेल असे वाटत असेल तर आम्ही हे डोमेन विनामूल्य देण्यास तयार आहोत. आम्ही योग्य कागदपत्रांसह डोमेन सोडू शकतो. ही पूर्णपणे आमची निवड आहे. रिलायन्स किंवा कोणत्याही कायदेशीर गटातील कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही किंवा कोणताही दबाव आणला नाही. आम्ही आमचे मित्र, कुटुंब किंवा इतर कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही.
जैनम (13) आणि जीविका (10) यांनी सांगितले की त्यांनी दिल्लीस्थित ॲप डेव्हलपरला मदत करण्यासाठी डोमेन विकत घेतले होते. डोमेन कमी पैशात विकत घ्यायचा आणि जास्त पैशात विकायचा आमचा हेतू नव्हता. डोमेनच्या माध्यमातून आमचा प्रवास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. ते म्हणाले की, त्यांना डोमेन खरेदी करण्यात स्वारस्य असलेल्या लोकांकडून अनेक ईमेल प्राप्त झाले आहेत ज्यांनी खूप पैसे ऑफर केले. मात्र आम्ही यासाठी नकार दिला.
हेदेखील वाचा- एवढं व्हायरल नव्हतं व्हायचं, मी JioHotstar डोमेनचा कायदेशीर मालक आहे; व्हायरल पोस्टवर डेव्हलपरची प्रतिक्रिया
जैनम आणि जीविका यांनी सांगितलं की, जर रिलायन्सला डोमेन विकत घ्यायचे असेल तर आम्ही डोमेन देण्यास तयार आहोत. रिलायन्सला हे डोमेन खरेदी करायचं नसल्यास आम्ही या डोमेनवरील आमच्या प्रवासाबद्दल अपडेट करत राहू. Jio आणि Disney+ Hotstar यांच्यातील डील फायनल झाल्यावर ही चर्चा झाली.
या वर्षाच्या सुरुवातीला रिलायन्सने Disney+ Hotstar खरेदी करण्याबाबत सांगितलं होते आणि आता हा करार निश्चित झाला आहे. त्याचवेळी दिल्लीतील एका डेव्हलपरने डोमेन खरेदी केले होते आणि रिलायन्सकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र आता जैनम आणि जीविका यांनी रिलायन्सला JioHotstar डोमेन मोफत ऑफर केलं आहे.