
Freelancers आणि YouTubers सावधान! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आधी काय व्हायचं, जे लोक वस्तू बाहेरच्या देशात पाठवायचे किंवा मोठ्या IT कंपन्या होत्या त्यांनाच RBI कडे असा फॉर्म भरावा लागायचा. याला SOFTEX म्हणायचे. पण आता RBI ने सगळ्या डिजिटल सेवा देणाऱ्यांना पण यात आणलंय. म्हणजे तुम्ही जरी एकटे काम करत असाल, घरी बसून फ्रीलान्सिंग करत असाल, तरी तुम्ही आता सरकारच्या नजरेत एक ‘सेवा निर्यातदार’ आहात. त्यामुळे तुम्हाला पण हे नियम पाळावे लागतील. नवीन नियम काय सांगतात?सरकारने यासाठी काही नियम ठरवले आहेत, ते खूप सोपे आहेत.
तुम्ही ज्या महिन्यात बाहेरच्या क्लायंटला बिल दिलं आहे, तो महिना संपल्यापासून 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन EDF फॉर्म द्यायचा आहे. बरं, प्रत्येक बिलासाठी वेगळा फॉर्म भरायची गरज नाही. RBI ने सांगितलंय की पूर्ण महिन्याचे सगळे बिल मिळून एकच फॉर्म भरला तरी चालेल. त्यामुळे छोट्या फ्रीलान्सर्सना जास्त त्रास होणार नाही.
तुम्ही काम केल्यानंतर किंवा बिल दिल्यानंतर 9 महिन्यांच्या आत ते पैसे तुमच्या भारतीय बँक अकाऊंटमध्ये जमा झाले पाहिजेत. यापेक्षा जास्त वेळ लावता येणार नाही.
तुम्ही क्लायंटसोबत काय बोललात, त्याचा मेल, तुम्ही दिलेलं इनव्हॉईस आणि बँकेकडून मिळणारं FIRC सर्टिफिकेट, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागणार आहे.10 लाखांपर्यंत कमाई असणाऱ्यांना टेन्शन नाहीयात सगळ्यात मोठा दिलासा छोट्या यूट्यूबर्स आणि फ्रीलान्सर्सना दिला आहे. जर तुमचं एका बिलाचं मूल्य 10 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, म्हणजे साधारण 12 हजार डॉलर्सपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला जास्त कागदपत्रांच्या मागे धावावं लागणार नाही. तुम्ही थेट तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन Self-Declaration करू शकता. हे काम फक्त 5-10 मिनिटांत होऊन जाईल. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही.
हा जरी टॅक्स नसला तरी हा RBI च्या EDPMS नावाच्या सिस्टीमला जोडलेला आहे. ही एक मोठी डिजिटल सिस्टीम आहे जिथे सगळ्या निर्यातीचा डेटा जमा होतो.जर तुम्ही वेळेत हा फॉर्म नाही भरला तर तुमचं परदेशातून येणारं पेमेंट अडकू शकतं. बँक तुमचे पैसे होल्डवर ठेवू शकते. तुम्ही योग्य पर्पज कोड आणि इनव्हॉईस दिल्याशिवाय ते पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. एवढंच नाही तर पुढे GST रिफंड घेताना किंवा ITR भरताना पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो.
त्यामुळे तुम्ही जर Google AdSense, Upwork, Fiverr किंवा थेट बँक ट्रान्सफरने पैसे घेत असाल, तर आत्ताच तुमच्या बँकेच्या फॉरेन डिपार्टमेंटला भेटा किंवा तुमच्या CA सोबत बोला. हा फॉर्म वेळेत भरून घ्या म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे कसलाही त्रास न होता तुमच्या खात्यात येतील.