X Edit Feature: X वर युजर्सना मिळणार चुका सुधारण्याची संधी, Elon Musk ने लाँच केलं मॅसेज एडीट फीचर! (फोटो सौजन्य - X)
Elon Musk च्या मालकीच्या X वर नेहमीच नवनवीन फीचर्स लाँच केले जात आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा X वापरतानाचा अनुभव अधिक चांगला होतो. Elon Musk च्या X वर आता एक नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. X वर आता इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मप्रमाणेच मॅसेज एडीट करण्याचं फीचर मिळणार आहे. आतापर्यंत सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर मॅसेज एडीट करण्याचं फीचर उपलब्ध होतं. आता हे फीचर X युजर्सना देखील मिळणार आहे. याबाबत X वर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- Elon Musk मुळे वाढलं Netflix, Hotstar चं टेंशन; आता तुमचे आवडते शो दिसणार टिव्ही ॲप X वर
आता X यूजर्सना मॅसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. चुकून मॅसेज पाठवला गेला तर X यूजर्स तो एडिट करू शकतात. WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर एडिट मेसेज फीचर आधीच सुरु झालं आहे. आता X यूजर्सना देखील हे नवीन फीचर मिळाले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. जर तुम्हाला X वर मॅसेज एडिट फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी नवीनतम आवृत्ती डाउनलोड करावी लागेल.
हेदेखील वाचा- AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! ‘या’ सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर
याशिवाय X वर व्हिडिओ कॉलिंग फीचर देखील लवकरच लाँच करण्यात येणार आहे. कंपनी सध्या या फीचरवर काम करत असून लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WhatsApp वरील व्हिडीओ कॉलिंग फीचर पूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. आता हे फीचर X वर देखील उपलब्ध होणार आहे. तसेच X युजर्सना आपला मोबाइल नंबर शेअर न करता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांशी कॉलवर कनेक्ट होण्याची परवानगी देणार आहे.
iOS, Android, Mac आणि PC वर हे नवीन फीचर लाँच केले जाणार आहेत. नवीन फिचर डायरेक्ट मेसेज मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच नवीन व्हिडिओ कॉलिंगच पर्याय वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असेल. यानंतर आता X वर मॅसेज एडीट फीचर देखील लाँच करण्यात येणार आहे. आतापर्यंत सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर मॅसेज एडीट करण्याचं फीचर उपलब्ध होतं. आता हे फीचर X युजर्सना देखील मिळणार आहे.