आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रत्येक क्षेत्रात पोहोचले आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. परंतु आजच्या काळात AI चा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. हल्ली लोक त्यांच्या AI इमेज तयार करतात. पण काहीवेळा या ईमेज खऱ्या वाटतात. म्हणजेच समोरची ईमेज AI च्या मदतीने तयार केली आहे की खरी ईमेज आहे हे ओळखणं कठीण होतं.
AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! 'या' सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर (फोटो सौजन्य - pinterest)
कोणतेही चित्र बारकाईने पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ती AI इमेज आहे की खरी. AI इमेज ओळखण्यासाठी तुम्ही काही सोप्या टीप्सचा वापर करू शकता.
आपण कोणत्याही व्यक्तीचा फोटो पाहिल्यास, त्याचा चेहरा आणि केस काळजीपूर्वक पहा. तुम्हाला फरक समजेल आणि या आधारावर तुम्ही हे ठरवू शकाल की तो फोटो AI ने तयार केला आहे की नाही.
फोटोमध्ये काही लिहिले असेल तर त्याकडे लक्ष द्या. AI साधनांद्वारे तयार केलेल्या प्रतिमांमध्ये मजकूर विखुरलेला असतो.
AI वाक्ये तयार करताना चुका करतात.
तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर तुम्ही AI फोटो अगदी सहज ओळखू शकता.
फोटोच्या सावल्या आणि प्रकाश काळजीपूर्वक पाहून तुम्ही AI फोटो ओळखू शकता.