Elon Musk मुळे वाढलं Netflix, Hotstar चं टेंशन; आता तुमचे आवडते शो दिसणार टिव्ही ॲप X वर (फोटो सौजन्य - X)
तुम्हाला तुमच्या टिव्हीवर एखादा चित्रपट किंवा तुमचा आवडता शो पाहायचा असेल तर तुम्ही कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करता? तुमच्या उत्तरामध्ये नक्कीच Netflix, Hotstar, Zee 5, Prime Video, Jio Cinema, या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. पण आता या सगळ्यांना टक्कर देण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लाँच झालं आहे, ते म्हणजे टिव्ही ॲप X. Elon Musk च्या मालकीचं X आता टिव्हीवर देखील पाहयला मिळणार आहे. इतर ओटीटी प्लॅटफॉर्मर्सना टक्कर देण्यासाठी Elon Musk ने X आता टिव्हीवर देखील लाँच केलं आहे. या X वर केवळ पोस्ट किंवा व्हिडीओ नाही तर तुम्ही तुमचे आवडते चित्रपट आणि शो देखील पाहू शकता.
हेदेखील वाचा- Google Pixel 9 Pro Fold ची पहिली विक्री सुरु! 10 हजार रुपयांच्या बंपर डिस्काऊंसह खरेदी करण्याची संधी
या नवीन लाँचिंगबद्दल Elon Musk ने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. X TV ॲपची बीटा आवृत्ती Android TV साठी रिलीज झाली आहे. ही बीटा आवृत्ती LG, Amazon Fire TV, Google TV या उपकरणांसाठी लाइव्ह करण्यात आली आहे. Netflix, Hotstar, Zee 5, Prime Video, Jio Cinema या प्रमाणे आता Elon Musk ने लाँच केलेलं X TV ॲप देखील टिव्हीवर पाहायला मिळणार आहे.
Elon Musk ने म्हटलं आहे की, X TV ॲपची बीटा आवृत्ती Android TV साठी रिलीज झाली आहे. ही बीटा आवृत्ती LG, Amazon Fire TV, Google TV या उपकरणांसाठी लाइव्ह करण्यात आली आहे. मात्र अद्याप हे X TV ॲप सर्वांसाठी उपलब्ध झालेलं नाही. काही ठरावीक वापरकर्त्यांसाठी हे X TV ॲप सुरु करण्यात आलं आहे. मात्र लवकरच हे X TV ॲप सर्वांसाठी सुरु करण्यात येणार आहे. आणि युजर्सना या X TV ॲपचा नक्कीच फायदा होणार आहे, यात काही शंकाच नाही. मात्र हे X TV ॲप सर्वांसाठी कधी पर्यंत उपलब्ध केलं जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. X TV वर यूजर्सना अनेक फायदे मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- WhatsApp अकाउंट डिलीट आणि डिएक्टिवेटमध्ये काय फरक आहे? अकाऊंटवरील डेटा कधी रिकव्हर होतो?
Google Play वर सूचीबद्ध केलेल्या तपशील आणि स्क्रीनशॉटनुसार, X TV ॲप नवीन OTT स्ट्रीमिंग ॲप बनू शकते. हे ॲप त्यांच्या फीचर्समुळे लवकरच लोकप्रिय देखील ठरेल. कारण पूर्वीपासून सुरु असणाऱ्या OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या शर्यतीत Elon Musk च्या X TV ॲपने उशीरा प्रवेश केला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पूर्वीपासून सुरु असणारे OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्सना चांगला अनुभव मिळावा आणि नवीन युजर्स जोडता यावे, यासाठी प्रचंड मेहनत करत असून अनेक ऑफर्स देखील देत आहेत. त्यामुळे X TV ॲपला या शर्यतीत टीकून राहण्यासाठी आणि नवीन युजर्स जोडण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.
कंपनीचा विश्वास आहे की X स्ट्रीम सर्व्हिस टीव्ही ही एक विशेष स्ट्रीमिंग टीव्ही सेवा आहे आणि ती प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यासाठी उपलब्ध असेल. यामध्ये तुम्हाला लाइव्ह चॅनेल, बातम्या, खेळ, चित्रपट, संगीत आणि हवामान यांच्याशी संबंधित अपडेट्स मिळू शकतील. युजर्सना X TV वर रिप्ले करण्याची सुविधा देखील मिळेल. तसेच, वापरकर्ते क्लाउड स्टोरेजद्वारे 72 तासांपर्यंत शो स्टोअर करू शकतील. ॲप 100 तासांपर्यंत विनामूल्य DVR रेकॉर्डिंग सुविधा देखील प्रदान करण्यास सक्षम असेल. X TV ॲप ऍक्सेस करण्यासाठी सबस्क्रिप्शन आवश्यक असू शकते.