Elon Musk च्या स्पेसएक्सने लाँच केलं मेगा स्टारशिप रॉकेट, काय आहे मस्कची योजना? वाचा सविस्तर
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि SpaceX चे मालक Elon Musk ने एक नवीन कथा लिहिली आहे. Elon Musk च्या SpaceX ने रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी मेगा स्टारशिप रॉकेट यशस्वीपणे लाँच केलं आहे. मेक्सिकोच्या सीमेजवळ टेक्सासच्या दक्षिणेकडील टोकावर सूर्योदयाच्या वेळी स्टारशिप रॉकेटने उड्डाण केलं. स्टारशिपची उंची अंदाजे 400 फूट म्हणजे 121 मीटर आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे आतापर्यंत बांधलेले सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट असल्याचं सांगितलं जातं आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्ट सुरु आहे बेस्ट डील, हे 5G स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
Elon Musk च्या SpaceX ने रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी मेगा स्टारशिप रॉकेटची यशस्वी चाचणी केली. 400 फूट उंच आणि 33 मिथेन इंधन इंजिनांसह हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी NASA ने SpaceX ला दोन स्टारशिप पाठवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांचा वेग 27000 किमी/तास आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
Elon Musk च्या SpaceX ने रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी मेगा स्टारशिप रॉकेटची यशस्वी चाचणी केली. SpaceX ने घेतलेली ही चाचणी सर्वात साहसी आणि सर्वात यशस्वी चाचणी होती. यापूर्वी, जून 2024 मध्ये SpaceX ने घेतलेली चाचणी सर्वात यशस्वी ठरली होती. ज्याने कोणत्याही स्फोटाशिवाय उड्डाण पूर्ण केले होते. त्यानंतर आता 13 ऑक्टोबर रोजी स्टारशिपची चाचणी पूर्ण झाली आहे. स्टारशिप रॉकेटची ही पाचवी चाचणी आहे.
एका बूस्टरवर 33 मिथेन इंधन इंजिनसह तयार केलेले सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली रॉकेट, स्टारशिपसाठी लाँच करण्याची Elon Musk ची मोठी योजना आहे. NASA कडून Space X ला दोन स्टारशिपची चंद्रावर उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दशकाच्या शेवटी अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्यासाठी NASA ने SpaceX ला दोन स्टारशिप पाठवण्याचे आदेश दिले आहेत. SpaceX च्या स्टारशिपचा वापर करून चंद्र आणि मंगळावर लोक आणि पुरवठा पाठवण्याचा उद्देश आहे.
हेदेखील वाचा- Smartphone Tips: ऑनलाइन किंवा ऑफलाइन! कुठून खरेदी करताय तुमचा नवीन स्मार्टफोन?
आम्ही तुम्हाला सांगतो की, स्टारशिपसाठी यापूर्वीही अनेक चाचण्या झाल्या आहेत. 14 मार्च 2024 रोजी झालेल्या चाचणीत पुन्हा प्रवेश केल्यानंतर स्टारशिपशी संपर्क तुटला. त्यावेळी SpaceX ने काही तांत्रिक बिघाडांमुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले होते. SpaceX च्या म्हणण्यानुसार, त्या वेळी पुन्हा प्रवेश करताना स्टारशिप टिकू शकली नाही. दुसऱ्या चाचणीबाबत बोलायचे झाले तर स्टेज सेपरेशनमधील अडचणींमुळे चाचणी यशस्वी होऊ शकली नाही. मात्र आता अखेर ही चाचणी यशस्वी झाली आहे. मस्कच्या SpaceX ने रविवारी, 13 ऑक्टोबर रोजी मेगा स्टारशिप रॉकेट यशस्वीपणे लाँच केलं आहे.