Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

Year Ender 2025: यावर्षभरात तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक मोठे बदल झाले. काही बदल तर इतके जबरदस्त होते की पाहता क्षणी सर्वजण चकित झाले. या वर्षभरात तंत्रज्ञान क्षेत्रात काय काय घडलं, याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2025 | 11:05 AM
टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं '2025' चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं '2025' चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

Follow Us
Close
Follow Us:
  • 2025 मधील टेक क्रांतीने बदललं भविष्य!
  • 2025 मध्ये टेक जगात काय काय घडलं? वाचा सविस्तर
  • स्मार्टफोन, रोबोट आणि AI ने जगाला केलं चकित
2025 मध्ये तंत्रज्ञान विश्व खास होतं. कारण अनेक दिग्गज कंपन्यांनी मोठे बदल करत नवीन गॅझेट्स लाँच केले. यातील काही गॅझेट्सनी यूजर्सची मन जिंकली आणि त्यांची जोरदार विक्री झाली. मात्र काही गॅझेट्स फ्लॉप ठरले. यंदा एआयने जगाला वेड लावलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत एआयचा वापर कितीतरी पटीने अधिक वाढला. एवढंच नाही तर रोबोट्स पूर्वीपेक्षा अधिक हुशार झाले. तसेच या बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर देखील वाढला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान झाली. त्यामुळे स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्सचा वापर करणाऱ्यांचा अनुभव देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगला झाला. स्मार्टफोन, आयफोन, रोबोट, एआय, स्मार्टवॉचसह इतर अनेक गॅझेट्स यावर्षी लाँच करण्यात आले.

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

पूर्वीपेक्षा अधिक दमदार झाले स्मार्टफोन्स

टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने यावर्षी त्यांचा पहिला सर्वात स्लिम आयफोन लाँच केला. हा आयफोन एअर या नावाने लाँच करण्यात आला. तर स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने त्यांचा पहिला ट्राय फोल्ड फोन लाँच केला. एवढंच नाही तर अनेक कंपन्यांनी एआय स्मार्टफोन्स लाँच करण्यावर देखील भर दिला. टेक कंपन्यांनी लाँच केलेल्या स्मार्टफोनचे फीचर्स पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाले. आता फोन फक्त कॉलिंग किंवा मेसेजिंगसाठी नाही तर एखाद्या एआय असिस्टंटसारखे वापरले जात आहेत. कॅमेरा क्वालिटी सुधारल्यामुळे लोकांमध्ये स्मार्टफोन फोटोग्राफीची वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

एआयने बदललं लोकांच आयुष्य

चॅटजीपीटी, गुगल जेमिनी, मेटा एआयने लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एकेकाळी एआय म्हणजे काय हेदेखील माहिती नसणारे यूजर्स आता त्यांच्या प्रत्येक कामासाठी एआय मॉडेल्सवर अवलंबून आहेत. अगदी मेसेज लिहिणे, अभ्यास, ऑफिसची कामं, फोटो-व्हिडिओ एडिटिंग सर्व कामांसाठी एआयची मदत घेतली जात आहे. एआयमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे, यात काही शंकाच नाही.

एलन मस्कच्या रोबोटने जिंकली लोकांची मन

एलन मस्कच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने यावर्षी ऑप्टिमस नावाचा एक रोबोट जगासमोर सादर केला. हा रोबोट अतिशय खास मानला जात आहे, कारण हा रोबोट माणसासारखा चालतो, वस्तू उचलतो आणि अनेक कामं करू शकतो. या रोबोटमध्ये टेस्लाने भविष्यातील एक झलक दाखवली आहे.

Year Ender 2025: रोलेबल लॅपटॉपपासून स्लिम आयफोनपर्यंत… यावर्षी लाँच झाले हे युनिक गॅजेट्स

इंटरनेट सेवा अधिक वेगवान झाली

जगभरातील इंटरनेट सेवा अधिक वेगवान व्हावी, यासाठी 2025 मध्ये प्रयत्न करण्यात आले. याशिवाय स्कॅम आणि सायबर गुन्हेगारांपासून लोकांचे संरक्षण व्हावे यासाठी सायबर सिक्युरिटी देखील वाढवण्यात आली. लोकांमध्ये ओटीपी, पासवर्ड, एआय फसवणूक याबद्दल जागरूकता पसरवण्यात आली.

इलेक्ट्रिक गाड्यांनी लोकांना घातली भुरळ

इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी झाल्या आणि रेंज वाढली. त्यामुळे 2025 मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी अधिक वाढली. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये फास्ट चार्जिंग देखील जोडण्यात आली.

टेक्नॉलॉजीमध्ये दिसली भविष्यातील झलक

रोबोट्स, स्मार्टफोन, एआय एवढंच घडलं का? तर नाही. स्मार्ट चष्मे, हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस, स्मार्ट वॅक्यूम क्लीनर, स्मार्टवॉच या सर्व गॅझेट्मध्ये भविष्याची झलक पाहायला मिळाली. 2025 मध्ये असे काही बदल झाले आणि काही असे खास गॅझेट्स लाँच करण्यात आले ज्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यापासून अगदी घरातील कामं करण्यापर्यंत आता तंत्रज्ञानामुळे सर्वकाही शक्य झालं आहे.

Web Title: 2025 is the gamechanger for technology many gadgets ai and robot were subject of attraction in this year tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • elon musk
  • smartphone
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स
1

Year Ender 2025: iPhone Air पासून Nothing Phone 3 पर्यंत… हे आहेत वर्षभरात लाँच झालेले फ्लॉप स्मार्टफोन्स

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
2

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Year Ender 2025: रोलेबल लॅपटॉपपासून स्लिम आयफोनपर्यंत… यावर्षी लाँच झाले हे युनिक गॅजेट्स
3

Year Ender 2025: रोलेबल लॅपटॉपपासून स्लिम आयफोनपर्यंत… यावर्षी लाँच झाले हे युनिक गॅजेट्स

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
4

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.