रात्री शांतपणे झोपण्यासाठी सुरु करा तुमच्या स्मार्टफोनचा Bedtime Mode, महत्त्वाच्या कॉलवरच मिळेल अलर्ट (फोटो सौजन्य - pinterest)
जर तुम्ही स्मार्टफोन युजर असाल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच पटेल, ती म्हणजे स्मार्टफोन जेवढी आपली गरज बनत आहे, तेवढाच तो आपल्यासाठी त्रासदायक देखील ठरत आहे. दिवसभर आपल्या हातात असणारा स्मार्टफोन आपल्याला रात्री देखील आरामात झोपू देत नाही. कधी कोणाचे कॉल, तर कधी कोणाचे मॅसेज, नाहीतर आपण डाऊनलोड केलेल्या अॅप्सचे नोटीफिकेश्नस. आपल्या स्मार्टफोनवर सतत कोणत्या ना कोणत्या मॅसेजची नोटिफिकेशन येत असते, त्यामुळे आपला लक्ष सतत फोनकडे जातो. काहीवेळा तर आपल्याला अनेक स्पॅम कॉल्स येतात.
हेदेखील वाचा- भारतात लाँच होण्यापूर्वीच iPhone 16 चे फिचर्स आणि किंमत आली समोर! वाचा किती स्वस्त असेल नवीन iPhone?
रात्रीच्या वेळी असे स्पॅम कॉल्स आले तर आपल्या झोपेची पूर्णपणे वाट लागते. आता याच सगळ्या समस्यांवर एक उपाय आला आहे. हा उपाय म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचा Bed Time Mode. तुम्ही रात्री झोपताना तुमच्या स्मार्टफोनमध्ये Bed Time Mode सुरु केला की अगदी सकाळी उठेपर्यंत तुमची स्पॅम कॉल्सच्या तावडीतून सुटका होईल. जर तुम्ही संपूर्ण दिवस तुमच्या कामासाठी स्मार्टफोनचा वापर करत असाल आणि रात्रीसुध्दा या स्मार्टफोनमुळे तुम्हाला झोप मिळणार नसेल, तर अशावेळी या स्मार्टफोनचं नेमकं काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. तुमच्या या प्रश्नावर उपाय म्हणजे स्मार्टफोनचा Bed Time Mode.
जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि जवळपास संपूर्ण दिवस डिव्हाइससोबत वेळ घालवला तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. रात्री झोपताना फोनची रिंग कुणालाही त्रास देऊ शकते. अशा परिस्थितीत, शांत झोप घेण्यासाठी तुम्ही तुमच्या Android फोनमध्ये Bed Time Mode सक्षम करू शकता.
हेदेखील वाचा- Pova 6 Neo 5G स्मार्टफोन या दिवशी होणार लाँच! AI फीचर्स आणि 108MP कॅमेऱ्याने सुस्सज
फोनमधील Bed Time Mode सह, तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांतपणे झोपू शकता. वास्तविक, डिजिटल युगात, प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्याची दैनंदिन दिनचर्या फोनशी जोडलेली आहे. अशा स्थितीत रात्री झोपतानाही अनेकदा फोन वाजतो . महत्त्वाच्या कामाचा फोन आला नाही तर झोपेचा त्रास होतो आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी कामावर दिसून येतो. Bed Time Mode मुळे फोन सायलेंट होतो. शिवाय, वॉलपेपर मंद होतो. फोनची स्क्रीन काळी आणि पांढरी होते.
आता जर तुम्ही असा विचार करत असाल की हा मोड चालू करून तुम्ही तुमचे अलार्म आणि महत्त्वाचे कॉल चुकवू शकता तर तसे नाही. या सेटिंगवर तुमचे अलार्म चुकवले जाणार नाहीत. याशिवाय, तुम्ही काही महत्त्वाच्या संपर्कांना स्टार मार्क करू शकता, जेणेकरून या संपर्कांचे कॉल मिस होणार नाहीत. सेटिंगसोबतच वारंवार कॉल करण्याबाबत अलर्टही उपलब्ध आहे.