Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

आगामी स्मार्टफोन सिरीजच्या लाँचपूर्वीच नथिंगने भारतात एक मोठी कारवाई केली आहे. Phone (4a) बाजारात येण्याआधीच नकली प्रोडक्ट्स जप्त करण्यात आले आहेत. याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 02:14 PM
टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

टेक ब्रँडची भारतात मोठी कारवाई! 1000 हून अधिक फेक Nothing प्रोडक्ट्स जप्त; Phone (4a) लाँचपूर्वी मोठी अ‍ॅक्शन

Follow Us
Follow Us:
  • नथिंग आणि सीएमएफच्या नकली प्रोडक्ट्सची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात
  • स्थानिक अधिकऱ्यांच्या मदतीने दुकांनावर छापा
  • नकली प्रोडक्ट्स नथिंग आणि सीएमएफच्या खऱ्या प्रोडक्ट्ससारखेच दिसतात
4 मार्च रोजी नथिंगची नवीन स्मार्टफोन सिरीज Phone (4a) लाँच केली जाणार आहे. मात्र या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कंपनीने भारतात एक मोठी कारवाई केली आहे. 1 हजारहून अधिक नकली नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्स जप्त करण्यात आले आहेत. बाजारात नकली प्रोडक्ट्स उपलब्ध असणं, ही एक अतिशय गंभीर समस्या आहे आणि यावर आता कंपनीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नथिंग आणि सीएमएफच्या नकली प्रोडक्ट्सची विक्री भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत नथिंगने अलीकडेच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये कंपनीने 1 हजारहून अधिक नकली नथिंग आणि सीएमएफ प्रोडक्ट्स दाखवण्यात आले होते. यामध्ये TWS इअरबड्स, चार्जर आणि इतर अ‍ॅक्सेसरीजचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

AI Impact Expo 2026: विकसित भारता’चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी… क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा

भारतात नकली नथिंग प्रोडक्ट्सचे नेटवर्क वाढले

टेक कंपनी नथिंगने शेअर केलेल्या माहितीनुसार, स्थानिक अधिकऱ्यांच्या मदतीने दुकांनावर छापा टाकण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात नकली नथिंग प्रोडक्ट्स जप्त करण्यात आले. हे नकली प्रोडक्ट्स नथिंग आणि सीएमएफच्या खऱ्या प्रोडक्ट्ससारखेच दिसत होते. यामुळे सामान्य ग्राहक अगदी सहज यावर विश्वास ठेवायचे आणि नकली प्रोडक्ट्स खरेदी करायचे. कंपनीचं म्हणणं आहे की, अशा सहसा छोट्या स्टोअर्सवर नकली प्रोडक्ट्सची सर्वात जास्त विक्री केली जात होती. कारण या ठिकाणी ग्राहक ब्रँडची सत्यता तपासत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)

नथिंग को- फाऊंडरने व्यक्त केली चिंता

नथिंगचे को- फाऊंडर आणि नथिंग इंडिया प्रेसीडेंट अकिस इव्हँजेलिडिस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून कंपनीच्या नकली प्रोडक्ट्सबाबत सतत तक्रारी केल्या जात होत्या. सीएमएफ बड्स आणि हेडफोन प्रो सारखे प्रिमियम प्रोडक्ट्स लोकल मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असं अकिस इव्हँजेलिडिस म्हणाले. आश्चर्याची गोष्टी म्हणजे काही दुकांनामध्ये असे प्रोडक्ट्स देखील विक्रीसाठी उपलब्ध होते, जे अद्याप लाँच देखील झाले नाहीत. मात्र देखील हे प्रोडक्ट्स नथिंग आणि सीएमएफ ब्रँडिंगसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर काही खोट्या एक्सेसरीजमध्ये अनरिलिज्ड कलर व्हेरिअंट देखील पाहायला मिळाले आहेत.

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

नकली एक्सेसरीजमुळे वाढतोय धोका

कंपनीने इशारा दिला आहे की, खोटे प्रोडक्ट्स खरेदी केल्यास केवळ पैसेच वाया जात नाहीत तर सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं. कारण नकली प्रोडक्ट्सची व्यवस्थित सुरक्षा चाचणी केली जात नाही. यामध्ये खराब वायरिंग किंवा लो क्वालिटी कॉम्पोनेंट असू शकतात. फॉल्टी चार्जर किंवा इयरबड्समुळे तुमचे फोन खराब होऊ शकतात आणि तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. काही घटनांमध्ये ओवरहीटिंगची समस्या देखील निर्माण होते. त्यामुळे प्रोडक्ट्स खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुमचे पैसे वाया जातील, तसेच तुमची सुरक्षा देखील धोक्यात येऊ शकते.

Web Title: Nothing in action mode company confiscated more than 1 thousand fake products before upcoming smartphone launch tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • nothing
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
1

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या
2

Bluetooth Types: ब्लूटूथ वापरताय? Classic आणि BLE मधला फरक माहितीये का? कोणता प्रकार कशासाठी वापरला जातो? जाणून घ्या

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर
3

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!
4

Tech Tips: एकाच ठिकाणी मिळणार PhonePe, GPay आणि Paytm ची पेमेंट हिस्ट्री, 90 टक्के लोकांना माहिती नाही सोपी पद्धत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.