Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

Air Taxi India: भारतात लवकरच पहिल्या हवाई टॅक्सीची एंट्री होणार आहे. द ईप्लेन कंपनी देशातील पहिल्या एअर टॅक्सीवर काम करत आहे आणि लवकरच ही टॅक्सी सर्वांच्या भेटीला येणार आहे. याबाबत जाणून घेऊ.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 09:57 AM
AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताला मिळणार हवाई टॅक्सी! AI समिटमध्ये मॉडेल सादर
  • भारतातील पहिली Air Taxi कधी सुरू होणार? जाणून घ्या
  • भविष्याचा प्रवास सुरू! ३६ किमी फक्त ८ मिनिटांत होणार पार
राजधानी दिल्लीत आयोजित भारत एआय इम्पॅक्ट परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे दर्शन घडले, एकीकडे गलगोटिया युनिव्हर्सिटीकडून चिनी रोबोट सादर केल्याने गालबोट लागले असले तरी अनेक नाविन्यपूर्ण आणि चांगल्या बाबीही एआय परिषदेत बघायला मिळाल्या, त्याचे मोठे कौतुकही होत आहे. यापैकी एक एआय-चालित हवाई टॅक्सीचे मॉडेल आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भविष्यात भारतात हवाई टॅक्सी सेवा उपलब्ध होऊ शकेल, एवढी क्षमता त्यात आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे मॉडेल आयआयटी मद्रासच्या सहकार्याने ईप्लेन नावाच्या कंपनीने विकसित केले आहे. कंपनीचा दावा आहे की, त्याचा वापर गर्दीच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीतून सुटका करण्यास मदतीचा ठरेल. विशेष म्हणजे, त्याला कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता राहणार नाही.

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

एका चार्जवर अनेक फेऱ्या

ती एका चार्जवर अनेक फेऱ्या करू शकते. कंपनीने त्याला (ई-व्हीटीओएल) असे नाव दिले आहे, ज्याचा अर्थ इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लडिंग आहे. विमाने आणि हेलिकॉप्टर सामान्यतः टेकऑफ करताना खूप आवाज करतात, परंतु हे असे करत नाही. त्याचा आवाज 120 डेसिबलपेक्षा कमी असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. ज्यामुळे खाली चालणाऱ्या लोकांनाही एअर टॅक्सी वरून उडत आहे, हे लक्षात येणार नाही आणि त्यांना या गोष्टीची भिती देखील वाटणार नाही. (फोटो सौजन्य – X)

बॅटरीवर चालत असल्याने स्वस्त, डिझाईनही मंजूर

ही हवाई टॅक्सी बॅटरीवर चालेल, ज्यामुळे वाहतूक खर्च कमी होईल. हेलिकॉप्टर चालवणे महाग आहे, कारण ते खूप इंधन वापरतात. ही हवाई टॅक्सी पूर्णपणे आयआयटी मद्रास येथे भारतात तयार करण्यात आली होती. चिप्स आणि मोटर्ससारखे आवश्यक घटक भारतात डिझाइन केले गेले होते, परंतु फक्त उत्पादन बाहेर केले गेले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या डिझाइनला मान्यता दिली होती आणि त्यानंतरच त्याची निर्मिती करण्यात आली.

डिजिटल ट्विन तंत्रज्ञानाचा वापर

स्टार्टअप ने एयर टॅक्सीचे एक अतिशय अचूक डिजिटल ट्विन तयार केले आहे. जे NVIDIA (एनवीडिया) च्या ओम्नीवर्स प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले आहे. हे वर्चुअल मॉडेल इंजिनिअर्सना वास्तविक उड्डाणपूर्वी फ्लाइट डायनामिक्स, सेंसर सिस्टम आणि आपत्कालीन परिस्थितीची डिजिटल वातावरणात चौकशी करण्याची परवानगी देते.

AI Impact Expo 2026: एआय भीती नाही तर भविष्य आणि नशीब बदलण्याची संधी… समिटमध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

उड्डाणापूर्वी कोणती चाचणी केली जाईल?

या डिजीटल मॉडेलच्या मदतीने इंजिनिअर्स लाखो किलोमीटरच्या वर्चुअल उड्डाणचा डेटा गोळा करू शकणार आहेत. यामुळे शहरी हवाई वाहतूक अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल आणि प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान जोखीम कमी होतील.

Web Title: India to get first air taxi service soon model unveiled at ai summit 2026 taxi can fly 36 km in just 8 minutes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा
1

Zscaler आणि भारती एअरटेलकडून सायबर लवचिकता मजबूत करण्यासाठी AI आणि सायबर धोका संशोधन केंद्राच्या स्थापनेची घोषणा

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर
2

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

Free Fire Max: ‘हे’ आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स… ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: ‘हे’ आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स… ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स

Stanford University: जनरेटिव्ह एआयने बदलले चित्र; ओपनएआय ते गुगल डीपमाइंडवर अब्जावधींची गुंतवणूक
4

Stanford University: जनरेटिव्ह एआयने बदलले चित्र; ओपनएआय ते गुगल डीपमाइंडवर अब्जावधींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.