Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरोपियन युनियनने Meta ला ठोठावला 102 करोड डॉलरचा दंड! नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या

Meta 102 करोड डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2019, पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती. Meta वर कोणत्या कारणासाठी दंड ठोठावला जाणं ही नवीन गोष्ट नाही. फेसबुक वापरकर्त्यांच्या पासवर्ड सुरक्षा त्रुटीमुळे आता पुन्हा एकदा Meta वर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा Mark Zuckerberg ला एक मोठा धक्का बसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 28, 2024 | 10:40 AM
युरोपियन युनियनने Meta ला ठोठावला 102 करोड डॉलरचा दंड! नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या

युरोपियन युनियनने Meta ला ठोठावला 102 करोड डॉलरचा दंड! नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

Mark Zuckerberg च्या Meta ला युरोपियन युनियनने 102 करोड डॉलरचा दंड ठोठावला आहे. 2019 च्या फेसबुक युजर्स संबंधित असणाऱ्या एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. युरोपियन युनियनच्या प्रायव्हसी रेग्युलेटरने शुक्रवारी फेसबुक युजर्सच्या पासवर्डशी संबंधित सुरक्षा त्रुटी प्रकरणी Meta ला 102 करोड डॉलरचा दंड ठोठावला आहे.

हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत

2019, पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती, आता अखेर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांनी मेटा या अमेरिकन कंपनीवर 91 दशलक्ष युरो म्हणजेच 101.6 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

Meta शी संबंधित या प्रकरणाची चौकशी 2019 साली सुरु झाली होती. काही फेसबुक युजर्सचे पासवर्ड अनवधानाने इंटरनल स्टोरेज झाले होते. म्हणजेच, युजर्सचे पासवर्ड फेसबुक कर्मचाऱ्यांना सहज सापडू शकतात. यामुळे युजर्सची प्राव्हसी आणि सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ही माहिती समोर येताच या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली.

याप्रकरणी Meta ने उत्तर देत म्हटलं होतं की, फेसबुक युजर्सच्या पासवर्ड संबंधित ही चूक दूर करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली होती. या पासवर्डचा गैरवापर किंवा अयोग्यरित्या प्रवेश केला गेल्याचा कोणताही पुरावा नाही. आम्ही या प्रकरणाच्या तपासादरम्यान आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनशी अर्थपूर्णपणे सहभाग घेतला आहे.

हेदेखील वाचा- Ranveer Allahbadia सारखी चूक तुम्ही करू नका, तुमच्या YouTube चॅनलला अशा प्रकारे हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा

उपायुक्त ग्रॅहम डॉयल म्हणाले की, “दुरुपयोगाचे धोके लक्षात घेऊन वापरकर्ता संकेतशब्द साध्या मजकुरात साठवले जाऊ नयेत हे सर्वमान्य आहे. तर मेटा म्हणाले की, ही त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही तात्काळ कारवाई केली आणि या पासवर्डचा गैरवापर केला गेला किंवा अयोग्यरित्या प्रवेश केला गेला असा कोणताही पुरावा नाही. आम्ही ही समस्या आमच्या लीड रेग्युलेटर, आयरिश डेटा प्रोटेक्शन कमिशनकडे सोपवली आहे.

Meta चे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या फ्लॅटफॉर्मचे करोड युजर्स देखील आहेत. Meta वर कोणत्या कारणासाठी दंड ठोठावला जाणं ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी, युजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल इंस्टाग्रामला 405 दशलक्ष युरो, व्हॉट्सॲपला 5.5 दशलक्ष युरो आणि ट्रान्सअटलांटिक डेटा पाठवल्याबद्दल मेटाला 1.2 अब्ज युरोचा दंड ठोठावण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा Meta वर एक नवीन दंड ठोठावण्यात आला आहे. फेसबुक वापरकर्त्यांच्या पासवर्ड सुरक्षा त्रुटीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. Meta वर ठोठावण्यात आलेल्या नवीन दंडामुळे आता पुन्हा एकदा Mark Zuckerberg ला एक मोठा धक्का बसला आहे.

Web Title: European union hits meta with 102 crore dollars privacy fine over 2019 password security lapse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Mark Zuckerberg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.