टेक जायंट कंपनी Apple ने नुकतीच त्यांची iPhone 16 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजमध्ये iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे चार मॉडेल्स लाँच करण्यात आले. iPhone 16 सिरीज भारतात लाँच होताच खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. iPhone 16 सीरीजमधील बॅटरी बॅकअप इतर iPhones पेक्षा चांगला आहे.iPhone 16 Pro मध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा आहे. iPhone 16 Pro गडद काळा टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि न्यू डेझर्ट टायटॅनियम अशा चार आकर्षक रंगात लाँच करण्यात आला आहे.
कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत (फोटो सौजन्य - pinterest)
भारतात iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपये आहे.
अमेरिकेत iPhone 16 ची किंमत 67,096 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 75,493 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 83,891 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,00,686 रुपये आहे. म्हणजेच हा फोन अमेरिकेत सुमारे 44 हजारांनी स्वस्त आहे.
दुबईत iPhone 16 ची किंमत 76,687 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 85,712 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 96,993 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,31,719 रुपये आहे.
सर्वात महाग iPhone 16 Pro Max, जपानमध्ये 1.11 लाख रुपये, कॅनडामध्ये 1.08 लाख रुपये आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1.20 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone 16 Pro Max व्हिएतनाममध्ये 1.19 लाख रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. सिंगापूरमध्ये या मॉडेलची किंमत 1.22 लाख रुपये, थायलंडमध्ये 1.21 लाख रुपये आणि फ्रान्समध्ये 1.37 लाख रुपये आहे.
चीनमध्ये iPhone 16 ची किंमत 70,760 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 82,556 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 94,351 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,17,942 रुपये आहे.
कॅनडामध्ये iPhone 16 ची किंमत 69,897 रुपये आहे. iPhone 16 Plus ची किंमत 79,184 रुपये आहे. iPhone 16 Pro ची सुरुवातीची किंमत 89,709 रुपये आहे आणि iPhone 16 Pro Max ची किंमत 1,08,282 रुपये आहे.