
फोटो सौजन्य - Social Media
3K हाय-रिझॉल्यूशन व्हिडिओमुळे वापरकर्ते चालता-बोलता क्षण सहज रेकॉर्ड करू शकतात. बिल्ट-इन Meta AI अॅथलेटिक परफॉर्मन्समध्येही मदत करते—सर्फिंग करताना लाटांची माहिती, गोल्फ खेळताना हवामानाचे विश्लेषण, किंवा जलद उत्तरांची आवश्यकता असताना एआय त्वरित सहाय्य करते. वापरकर्त्याने फक्त “Hi Meta” म्हटले की ग्लासेस तात्काळ सक्रिय होतात. Meta HSTN चे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे हिंदीमध्ये एआयसह संवाद साधण्याची सुविधा, जी Meta AI अॅपमधील सेटिंग्जमधून सक्षम करता येते. प्रश्न विचारणे, मीडियावर नियंत्रण, कॉल करणे, कंटेंट कॅप्चर करणे, हे सर्व आता हिंदीत शक्य झाले आहे. सेलिब्रिटी एआय व्हॉईसेसचा अनुभवही यामध्ये देण्यात आला असून पहिला आवाज म्हणून दीपिका पदुकोणचा एआय व्हॉईस Meta AI मध्ये जोडण्यात आला आहे.
भविष्यात अनेक सेलिब्रिटी आवाज उपलब्ध होतील. अत्यंत उपयुक्त असे आणखी एक आगामी फीचर म्हणजे UPI Lite Payments. वापरकर्ते फक्त QR कोडकडे पाहून “Hi Meta, Scan and Pay” म्हटले की पेमेंट पूर्ण होईल, त्यासाठी फोन हातात घ्यायची गरज नाही. व्यवहार WhatsApp शी लिंक असलेल्या बँक खात्यातून सुरक्षितरीत्या होतील. या ग्लासेसमध्ये Oakley च्या प्रिझम आणि ट्रान्झिशन्स तंत्रज्ञानासह सहा फ्रेम-लेन्स कलर पर्याय उपलब्ध आहेत.
Warm Grey with Prizm Ruby, Black with Prizm Polar Black, Brown Smoke with Prizm Deep-Water, Black with Transitions Amethyst, Clear with Transitions Grey आणि Black with Clear Lenses. हे सर्व मॉडेल्स RX-सुसज्ज आहेत, म्हणजेच चष्मा लावणाऱ्यांसाठीही योग्य. Oakley Meta HSTN हा केवळ स्मार्ट ग्लासेसचा नवीन प्रकार नाही, तर तंत्रज्ञान, स्टाइल आणि एआयची जोड देणारा एक कॉम्पॅनियन आहे, जो स्पोर्ट्स परफॉर्मन्सपासून दैनंदिन कामांपर्यंत प्रत्येक अनुभव अधिक स्मार्ट, सोपा आणि कार्यक्षम बनवतो.