
Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात का? थांबा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आता आम्ही तुम्हाला अशा गॅझेटबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत टिव्हीवरील शो देखील पाहता येणार आहेत आणि यासोबतच तुम्हाला घरातच थिएटरसारखा अनुभव देखील मिळणार आहे.
टेक कंपनी FIZIX ने भारतात नवीन प्रोजेक्टर लाँच केला आहे. कंपनीने हा प्रोजेक्टर FIZIX FX-PRO या नावाने लाँच केला असून यामध्ये अनेक दमदार AI फीचर्स देण्यात आले आहेत. हा कंपनीचा पहिला असा प्रोजेक्टर आहे, ज्यामध्ये AI मेमोरीसिंक आणि AI ब्राइटबूस्ट सारखे स्मार्ट फीचर्स दिले आहेत. या फीचर्सच्या मदतीने प्रोजेक्टरचा वापर अधिक सोपा आणि मजेदार होणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या प्रोजेक्टरवर उत्तम पिक्चर क्वालिटी देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – FIZIX)
हा एक फुल HD प्रोजेक्टर आहे, ज्यामध्ये 8.3 मिलियनहून अधिक पिक्सेल देण्यात आले आहेत. याच कारणामुळे तुम्हाला या प्रोजेक्टरवर शो आणि चित्रपट पाहताना अतिशय उत्तम, क्लियर आणि शार्प पिक्चर क्वालिटी मिळणार आहे. याचे नेटिव रिजॉल्यूशन 1920×1080 आहे. याशिवाय युजर्स यामध्ये 4K व्हिडीओ देखील प्ले करू शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, याचा 30000:1 काँट्रास्ट रेशियो व्हिडीओचा कलर आणि डेप्थ अधिक वाढवते, ज्यामुळे युजर्सना चांगला अनुभव मिळतो.
FIZIX ने लाँच केलेल्या या नवीन प्रोजक्टरची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये AI ब्राइटबूस्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. जी 1800 ANSI लुमेन ब्राइटनेसला सपोर्ट करते. याच्या मदतीने प्रोजक्टर उजेट असलेल्या रुममध्ये देखील क्लिअर आणि ब्राइट पिक्चर क्वालिटी देतो. याचा अर्थ तुम्ही घरात आणि घराबाहेर देखील या प्रोजेक्टरचा वापर करू शकणार आहात.
एवढंच नाही तर या प्रोजेक्टरमध्ये AI मेमोरीसिंक फीचर दिला आहे. या फीचरच्या मदतीने प्रोजेक्टर कोणत्याही ठिकाणाला ओळखण्यासाठी आणि आपोआप स्क्रीन एडजस्ट करण्यासाठी देखील मदत करणार आहे. याशिवाय प्रोजेक्टरमध्ये ऑटो फोकस, ऑटो रोटेशन करेक्शन, स्क्रीन अलाइनमेंट आणि ऑब्स्टेकल अवॉइडेंस सारखे अनेक स्मार्ट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. म्हणजेच तुम्ही प्रोजेक्टर कसाही ठेवला तरी देखील तुम्हाला अगदी स्पष्ट व्हिजुअल्स पाहायला मिळणार आहेत.
कनेक्टिविटीसाठी या प्रोजेक्टरमध्ये ब्लूटूथ 5.2, डुअल-बँड वाय-फाय, 2 USB पोर्ट आणि 1 HDMI पोर्ट देण्यात आला आहे. प्रोजेक्टरमध्ये अँड्रॉईड 9.0, 64GB स्टोरेज आणि 2GB रॅम दिली आहे, ज्यामुळे तुम्ही थेट प्रोजेक्टरवर यूट्यूब, नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ सारख्या अॅप्सचा वापर करू शकणार आहेत.
FX-PRO प्रोजेक्टर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून केवळ 24,999 रुपयांत प्रोजेक्टर खरेदी करू शकणार आहेत. तर कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी केल्यास 5 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. या ऑफरनंतर प्रोजेक्टरची किंमत 19,999 रुपये होणार आहे.
Ans: इंटरनेटशी कनेक्ट होणारा आणि OTT अॅप्स, यूट्यूब, ब्राउझर सारखे फीचर्स असणारा टीव्ही म्हणजे स्मार्ट टीव्ही.
Ans: मोठ्या स्क्रीनसारखा डिस्प्ले तयार करण्यासाठी भिंतीवर किंवा पडद्यावर प्रतिमा प्रोजेक्ट करणारे उपकरण.
Ans: LED, LCD, DLP, स्मार्ट प्रोजेक्टर, पोर्टेबल प्रोजेक्टर.