
Lava Bold N2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! देशी कंपनीच्या नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत 8 हजारांहून कमी
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Lava Bold N2 स्मार्टफोन भारतात 7,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. हे डिव्हाईस 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटसह उपलब्ध आहे. डिव्हाईसची विक्री 27 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ग्राहक अॅमेझॉनवरून Lava Bold N2 खरेदी करू शकतात. कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन इंडस ब्लॅक आणि सियाचिन व्हाईट अशा दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर लावा बोल्ड N2 मध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे आणि यामध्ये वॉटर ड्रॉप-स्टाइल नॉच पाहायला मिळतात. डिव्हाईस डुअल सिमसह अँड्रॉईड 15 Go वर चालते. कंपनीने दावा केला आहे की, हँडसेट ब्लोटवेअर किंवा जाहिरातींपासून मुक्त आहे, जो क्लीन अँड्रॉइड अनुभव ऑफर करतो.
Introducing Bold N2: Be Fearless. Be Bold. Price: ₹7,499
Sale Starts 27th Feb, 12PM
Only On Amazon ✅ 17.13cm (6.75″) HD+ Display
✅ 13MP AI Dual Rear Camera | 5MP Selfie Camera
✅ 4GB+4GB* RAM | 64GB ROM
✅ IP64 Dust & Water Resistant
✅ Clean Android experience – No… pic.twitter.com/GxBodeLFUV — Lava Mobiles (@LavaMobile) February 17, 2026
बोल्ड N2 मध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे. डिव्हाईस यूनिसोक SC9863A चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये आठ कोर आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB बिल्ट-इन स्टोरेज आहे. हे डिव्हाइस 4 जीबी पर्यंत रॅम वाढवण्यास सपोर्ट करते, त्यानंतर फोनची रॅम 8 जीबी पर्यंत वाढते.
फोटोग्राफीसाठी लावाच्या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी लेंस आणि आणखी एक कॅमेरा आहे, ज्याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Lava Bold N2 मध्ये 5,000mAh बॅटरी आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.