
Flipkart Black Friday: विशलिस्ट तयार केली का? Flipkart ब्लॅक फ्राइडे सेलची तारीख जाहीर, आता स्वस्तात खरेदी करा महागडे प्रोडक्ट्स
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 2025 मध्ये विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स जसे स्मार्टफोन, स्मार्टवॉच, होम एंटरटेनमेंट सिस्टम, टिव्ही, लॅपटॉप, पीसी, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर सारख्या इत्यादी वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. गॅझेट्स व्यतिरिक्त, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कपडे, डेली एसेंशियल्स आणि होम डेकोर आइटम्स देखील ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देणार आहे. याशिवाय फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी कंपनी अमेझॉन देखील लवकरच ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा करण्याची अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ई-कॉमर्स प्लेटफॉर्मने घोषणा केली आहे की, फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 2025 हा 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. सेल ईव्हेंटसाठी एक डेडिकेटेड माइक्रोसाइट कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह आहे. सेलदरम्यान डिस्काउंटवर उपलब्ध असणाऱ्या प्रोडक्ट्सबबाबत या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स जसे फोन, स्मार्टवॉच, टिव्ही, होम थिएटर्स, वॉशिंग मशीन, होम अप्लायंसेज, पीसी, लॅपटॉप, एयर कंडीशनर, प्रिंटर्स, मिक्सर, फॅन, डिशवॉशर आणि रेफ्रिजरेटर अपकमिंग फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 2025 मध्ये अपेक्षेपेक्षा कमी किंमतीत विकले जाण्याची शक्यता आहे. याशिवाया सेलमध्ये सॅमसंग आणि LG सारखे मोठे ब्रँड्सचे प्रोडक्ट्स देखील डिस्काऊंट आणि ऑफर्ससह उपलब्ध असणार आहेत. कस्टमर्स UPI, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट करू शकणार आहेत. ज्या लोकांना पूर्ण पेमेंट एकसाथ द्यायचा नसेल त्यांच्यासाठी EMI प्लॅन ऑप्शन देखील उपलब्ध आहे. सवलतीचा जलद फायदा घेण्यासाठी, यूजर्सना त्यांच्या फ्लिपकार्ट खात्यात त्यांचे पेमेंट डीटेल्स आधीपासूनच सेव्ह करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
याशिवाय, फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 2025 च्या बॅनरमध्ये Asus Chromebook लॅपटॉप देखील पाहायला मिळत आहे. ज्यामुळे हा लॅपटॉप सेलमध्ये अत्यंत कमी किंमती उपलब्ध असेल अशी शक्यता आहे. विंटर सीजनसाठी इलेक्ट्रॉनिक आइटम्स जसे रूम हीटर्स आणि गीजरवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
Ans: Flipkart दर वर्षी ठराविक दिवशी ग्राहकांसाठी मोठ्या सवलतींसह सेल आयोजित करते. यात इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, फॅशन, ग्रोसरी आणि इतर वस्तूंवर ऑफर्स मिळतात.
Ans: हे साधारणपणे सप्टेंबर–ऑक्टोबर दरम्यान दिवाळीपूर्वी होतात. पण इतर छोट्या सेल्स वर्षभर येतात.
Ans: काही पार्टनर बँकांच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर विशिष्ट प्रॉडक्टसाठी नो-कॉस्ट EMI उपलब्ध असते.