फोटो सौजन्य -iStock
आजच्या स्मार्टफोनच्या काळात मोबाईल ॲप्सचा वापर अगदी आवश्यक झाला आहे. संवाद, करमणूक आणि उत्पादकता सगळ्यासाठी मोबाईल ॲप्सचा वापर केला जातो. पण या सगळ्यासोबत एक धोका देखील निर्माण होत आहे. तो म्हणजे बनावट ॲप्सचा. बनावट ॲप्सचा वापर करून लोकांची फसवूणक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे. सायबर गुन्हेगार अत्यंत हुशारीने विश्वासार्ह ॲप्सची नक्कल करतात आणि बनावट ॲप्स बनवतात. यामुळे युजरची गोपनीयता आणि सुरक्षितता धोक्यात येते. तसेच डेटा चोरी आणि आर्थिक नुकसानीचाही धोका असतो. बनावट ॲपचे परिणाम व्यक्ती आणि व्यवसायांसाठी अत्यंत गंभीर असू शकतात.
हेदेखील वाचा – Union Budget App: सरकारच्या या अॅपवर मिळणार Union Budget संबंधित सर्व माहिती! आत्ताच डाऊनलोड करा
बनावट ॲप्स हे खऱ्या ॲप्सच्या डिझाइन आणि कार्यक्षमतेची एवढी हुबेहुब नक्कल करतात की या दोन्हींमधला फरक ओळखणं कठीण आहे. एखादा सामान्य नागरिक बनावट ॲप्स आणि खऱ्या ॲप्समधील फरक सहज ओळखू शकत नाही. ॲप स्टोअरमध्ये असे बनावट ॲप्स वारंवार दिसू लागले की त्याबद्दल खात्री वाटायला लागते. त्यामुळे युजर्स हे ॲप्स त्यांच्या फोनमध्ये डाऊनलोड करतात. पण बनावट ॲप्स ऑनलाइन व्यवहार क्षेत्रात ग्राहक आणि व्यापारी अशा दोघांनाही फसवतात. हे ॲप्स लॉगिन क्रेडेन्शिअल्स चोरतात तसेच ते युजर डेटाशी तडजोड करू शकतात, आणि पेमेंट प्रक्रियेतही फेरफार करू शकतात.
फसवणूक करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या डिव्हाइसवर पेमेंट कन्फर्मेशन दिसावे यासाठी बनावट ॲप्सचा वापर करतात. स्टोअरचा QR कोड स्कॅन केल्यानंतर यशस्वी व्यवहार झाला असल्याचे दर्शवतात. अशा फसव्या युक्तीमुळे सुरक्षिततेच्या उपायांमध्ये अडथळा येतो आणि दुकानदारांना पेमेंट पूर्ण झाल्याचा विश्वास दिला जातो. परंतु वास्तविक पैसे दिलेच जात नाहीत. या बनावट ॲप्सपासून सुरक्षित राहण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांकडून काही टीप्स शेअर करण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा – इंटरनेट सेवा खंडित झाल्यास टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना बिलात सूट देऊ शकतात का? जाऊन घ्या सविस्तर