Union Budget App
आज 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सादर होणारा हा अर्थसंकल्प महिला, युवा, उद्योजक, शेतकरी, प्रत्येक वर्गासाठी महत्त्वाचा असणार आहे. या अर्थसंकल्पाबबात प्रत्येकाला माहिती मिळावी यासाठी सरकारने एक अॅप लाँच केलं आहे. Union Budget App असं या सरकारी अॅपचं नाव आहे. ज्या कोणाला अर्थसंकल्पबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे अॅप डाऊनलोड करू शकता. सरकारचे अधिकृत Union Budget App प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरणार आहे.
हेदेखील वाचा – Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष
Union Budget App अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती लेखी स्वरूपात सादर करते. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी तुम्ही हे ॲप तुमच्या फोनवर डाऊनलोड केल्यास, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पापासून आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत सर्व माहिती तुम्ही या ॲपवर वाचू शकता. ॲपमध्ये बजेटशी संबंधित माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. Union Budget App इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषेची निवड करू शकता. भाषेची निवड केल्यानंतर ॲपमधील सर्व माहिती तुम्ही निवडलेल्या भाषेमध्ये उपलब्ध होईल. तसेच पीडीएफ फॉरमॅटमधील माहिती देखील तुम्ही निवडलेल्या भाषेतच दिसेल. त्यामुळे तुम्ही अगदी सहज ही माहिती वाचू शकता.
हेदेखील वाचा – Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केला पहिला आर्थिक सर्वेक्षण, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP वाढणार?
Union Budget App मध्ये नागरिकांसाठी कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तुम्ही बजेटशी संबंधित कोणतेही कागदपत्रे वाचता तेव्हा ते डाऊनलोड करण्याचा पर्याय त्याच्यावर दिसतो. डाउन ॲरो आयकॉनवर क्लिक केल्यावर, बजेट डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅटमध्ये फोनवर डाउनलोड केले जाते. त्यामुळे तुम्ही ही माहिती कधीही वाचू शकता. तुम्ही Google Play Store वरून Union Budget App तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकता. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केले आहे. आतापर्यंत हे ॲप 1 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. या ॲपला Google Play Store वर 3+ रेटिंग मिळाले आहे.
Union Budget App डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही अगदी सहज अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती पीडीएफ स्वरूपात वाचू शकता. तसेच ही माहिती वाचण्यासाठी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी असे दोन पर्याय दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या भाषेत ही माहिती वाचू शकता.