‘Out of Stock’ चा खेळ अखेर संपणार! Amazon-Flipkart सेलमध्ये खरेदी करा हव्या त्या वस्तू, आत्ताच वापरा ही कमाल Trick
ई कॉमर्स कंपन्या Amazon आणि Flipkart वर सेल सुरु झाले आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची संधी मिळत आहे. स्मार्टफोनपासून स्मार्ट टिव्हीपर्यंत आणि होम अप्लायंसेसपासून फॅशनपर्यंत अनेक वस्तूंवर आकर्षक आणि जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे अनेक वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. सेलमध्ये अनेक लोकं त्यांच्या आवडत्या वस्तू खरेदीसाठी उत्सुक असतात.
सेलदरम्यान अनेक ग्राहकांना एका सामान्य समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या म्हणजेच ‘Out of Stock’! जेव्हा तुमच्या आवडत्या वस्तू किंवा एखादं गॅझेट जे तुम्हाला खरेदी करायचं आहे जर ते आऊट ऑफ स्टॉक झालं तर ग्राहक नाराज होतात. पण आता आम्ही तुम्हाला काही टिप्सबद्दल सांगणार आहोत. या अशा टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तू आऊट ऑफ स्टॉक होण्याआधीच खरेदी करू शकणार आहात.
अमेझॉन प्राइम किंवा फ्लिपकार्ट प्लस सारख्या मेंबरशिप तुम्हाला बाकी युजर्सच्या आधीच सेलचा एक्सेस देते. डिस्काउंटवाल्या प्रोडक्ट्सची संख्या मर्यादित असल्याने, लवकर साइन-इन केल्यास खरेदी करण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही सदस्य नसाल, तर विक्रीपूर्वी सब्सक्रिप्शन घेणे फायदेशीर आहे.
अनेकदा ‘Out of Stock’ दिसल्यानंतर देखील प्रोडक्ट्स लगचेच पुन्हा उपलब्ध होतात. असं तेव्हा होतं जेव्हा कंपनी त्यांच्या वेयरहाउसमधून नवीन स्टॉक्स जोडते. यासाठी तुमचा आवडता आयफोन किंवा गॅझेट खरेदी करण्यासाठी पेज वांरवार रिफ्रेश करत राहा. कारण यामुळे तुम्हाल आऊट ऑफ स्टॉक्स झालेले प्रोडक्ट्स काही मिनिटांतच पुन्हा खरेदी करण्याची संधी मिळते.
सेल सुरु होण्याआधीच तुम्हाला ज्या वस्तूंची खरेदी करायची आहे त्या वस्तू विशलिस्टमध्ये जोडा. यामुळे सेल सुरु होताच तुम्ही या सर्व वस्तू ऑर्डर करू शकता. यामुळे तुमच्या आवडत्या वस्तू आऊट ऑफ स्टॉक होण्याची शक्यता कमी होते. ही ट्रिक खास करून अशा प्रोडक्ट्ससाठी फायदेशीर ठरू शकते, ज्यांची मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे.
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर नोटिफाय मी किंवा बॅक इन स्टॉक फीचर उपलब्ध आहे. खरेदी करण्यापूर्वी ही फीचर ऑन करा. त्यामुळे तुमचे आवडते उत्पादन पुन्हा स्टॉकमध्ये आल्यावर तुम्हाला त्वरित सूचना मिळतील. अशा प्रकारे, सेल दरम्यानही तुम्ही कोणताही डील चुकवणार नाही.
अनेकदा एकचं प्रोडक्ट काही प्रदेशांत आऊट ऑफ स्टॉक दिसतं. तर दुसऱ्या प्रदेशात ते प्रोडक्ट उपलब्ध असतं. अशावेळी तुम्ही दूसरा डिलीवरी एड्रेस आणि पिनकोड टाकून चेक करू शकता.