Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

OTT Apps Ban: केंद्र सरकारने पुन्हा एकदा अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ओटीटी अ‍ॅप्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने 5 ओटीटी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. मंत्रालयाने योग्य प्रक्रियेनंतर या प्लॅटफॉर्मवर ही कारवाई केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 11:37 AM
भारत सरकारचा मोठा निर्णय! 'या' 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

भारत सरकारचा मोठा निर्णय! 'या' 5 ओटीटी अ‍ॅप्सवर घातली बंदी, अश्लील कंटेंट दाखवल्याने केली कारवाई

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा एकदा 5 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बॅन
  • भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने घेतला निर्णय
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कंटेट
भारत सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 5 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने बंदी घातलेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये मूडएक्सवीआईपी, कोयल प्लेप्रो, डिजी मूवीप्लेक्स, फील आणि जुगनू या नावांचा समावेश आहे. यापूर्वी देखील 2025 मध्ये सरकारने भारतात 25 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बॅन केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा 5 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Meta ने यूजर्सना दिला मोठा धक्का! एप्रिल 2026 पासून बंद होणार ‘ही’ वेबसाईट, काय आहे कंपनीचा नवीन प्लॅन?

गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून हटवले अ‍ॅप्स

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत आदेश देखील जारी केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, सरकारने योग्य प्रक्रियेचा अवलंब करून ओटीटी प्लॅटफार्म्स मूड एक्सवीआईपी, कोयल प्लेप्रो, डिगी मूवीप्लेक्स, फील आणि जुगनूवर बंदी घालण्याच निर्णय घेतला आहे. हे 5 ओटीटी प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून देखील हटवण्यात आले आहेत. अश्लील कंटेट दाखवणारे हे अ‍ॅप्स लाखो लोकांनी डाऊनलोड केले होते. गेल्यावर्षी देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 25 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये एएलटीटी, उल्लू, डेसिफ्लिक्स सारख्या इत्यादी अ‍ॅप्सचा समावेश होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

डिजिटल कंटेंटच्या नियमांचे उल्लंघण

केंद्र सरकारने सांगितंल आहे की, बॅन करण्यात आलेले 5 ओटीटी अ‍ॅप्स डिजिटल कंटेंटच्या नियमांचे उल्लंघण करत होते. याच कारणामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे प्लॅटफॉर्म्स बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म्स एडल्ट कंटेंट स्ट्रीम करत होते. या प्लॅटफॉर्म्सनी डिजीटल मीडियासंबंधित नियमांचे देखील उल्लंघण केले आहे. अहवालांनुसार, या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा आणि कंटेंटचा आढावा यासारख्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.

सरकार ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल कंटेंटवर विशेष लक्ष देत आहे

जेव्हा एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर कंटेट आढळतो, तेव्हा सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करते आणि संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर योग्य कारवाई देखील करते. मंत्रालय सतत ओटीटी स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर लक्ष ठेवत असते, ज्यामुळे माहिती तंत्रज्ञान नियम आणि डिजिटल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाते आणि चुकीचा कंटेट प्रसारित केला जात नाही.

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

गेल्या काही काळापासून सरकार ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल कंटेंटवर विशेष लक्ष देत आहे. याचं कारण म्हणजे देशभरात वेब सीरीज, चित्रपट आणि शॉर्ट व्हिडीओ पाहणाऱ्या यूजर्सची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत, डिजिटल क्षेत्रातील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना, विशेषतः मुलांना हानिकारक सामग्रीपासून संरक्षण मिळू शकेल. अद्यापही काही यूजर्स आहेत, जे बॅन करण्यात आलेले प्लॅटफॉर्म्स वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना लॉगिन करताना अडचणी येत आहेत. सरकारने ज्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे, ते प्लॅटफॉर्म्स जर तुम्ही फोनमध्ये डाऊनलोड केले असतील, तर त्वरित डिलीट करा.

Web Title: Indian government banned these 5 ott apps because apps were showing obscene content tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Indian government
  • OTT
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी
1

मोबाइल कनेक्शनसोबत मनोरंजनाचा डबल डोस! ‘या’ Airtel ग्राहकांना मिळू शकते ‘मिर्झापूर’च्या प्रीमियरची खास संधी

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या
2

Appleच्या सिंहासनावर नवा चेहरा! Tim Cook यांच्यानंतर John Ternus हाती घेणार कंपनीची सूत्रे, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास? जाणून घ्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
3

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप
4

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.