Diamonds, Emote आणि Bundle फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी, Free Fire Max प्लेअर्स आत्ताच वापरा हे Redeem Codes
फ्री फाय मॅक्स प्लेअर नेहमीच इन-गेम आइटम्सच्या शोधात असतात. पण हे इन-गेम आइटम्स मिळण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात डायमंड खर्च करावे लागतात. जर डायमंड पाहिजे असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पण पैसे न खर्च करता देखील फ्री फायर मॅक्स इन-गेम आइटम्स मिळवू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करून Garena ने जारी केलेले रेडिम कोड शोधावे लागतात. प्लेअर्सना इन-गेम आइटम्स मिळवण्यासाठी डायमंड आणि पैसे खर्च करावे लागू नयेत, म्हणून कंपनी रोज रेडिम कोड जारी करत असते. या कोड्सच्या मदतीने फ्री फाय मॅक्स प्लेअर्स Diamonds, Emote आणि Bundle फ्रीमध्ये मिळवू शकतात.
Garena फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी ,वेळोवेळी ईव्हेंट देखील आयोजित करत असते. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना काही टास्क पूर्ण करून Diamonds, Emote आणि Bundle अशी बक्षिस मिळतात. पण रेडिम कोडच्या मदतीने तुम्ही कोणतंही टास्क पूर्ण न करता ही बक्षीस मिळवू शकतात. पण यासाठी तुम्हाला लवकरात लवकर या रेडिम कोड्सचा वापर करावा लागतो. कारण हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. फ्री फायर मॅक्समधील रेडिम कोड्सच्या मदतीने प्लेअर्स Diamonds, वेपन्स, पेट्स, कॅरेक्टर आउटफिट्स इत्यादी मोफत मिळवू शकतात. यासाठी प्लेअर्सना डायमंड किंवा पैसे खर्च करण्याची देखील गरज नसते. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये अलीकडेच OB49 अपडेट रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आता कंपनी OB50 अपडेट रिलीज करणार आहे. बराच काळ वाट बघितल्यानंतर आता गेम डेवलपर कंपनीने नवीन OB50 अपडेटची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने नवीन अपडेटसाठी प्री-रजिस्ट्रेशन देखील सुरु केलं आहे. रजिस्ट्रेशन करणाऱ्या प्लेअर्सना नव्या सिझनसोबतच नवीन रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. Free Fire MAX चे OB50 अपडेट भारतात 30 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता अधिकृतपणे लाईव्ह होणार आहे. प्लेअर्स गुगल प्ले स्टोअरवर जाऊन त्यांचा नवीन गेम अपडेट करू शकतात.
Smartphone Leaks: Google च्या अपकमिंग स्मार्टफोनचे फिचर्स लीक, अशी असणार डिझाईन… लाँच डेट जाणून घ्या
Free Fire MAX OB50 Update डेडिकेटेड बॅनर गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या बॅनरवर OB50 अपडेटसह Coming Soon असा टॅग देण्यात आला आहे. याशिवाय बॅनरच्या टॉपला अपडेट रिलीज होण्याची तारीख देखील सांगण्यात आली आहे. हे नवीन अपडेट 30 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता लाईव्ह होणार आहे. यासोबतच गेम डेवलपर कंपनीने ओबी50 अपडेटसाठी प्री-रजिस्ट्रेशन देखील सुरु केले आहे. जे गेमर्स अपडेटसाठी प्री-रजिस्ट्रेशन करणार आहेत, त्यांना ढासू रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. नवीन अपडेट गेममध्ये अनेक नवीन गोष्टी आणणार आहे, ज्यामध्ये नवीन फीचर्स, मॅप, गेमप्ले, कॅरेक्टर्स आणि वेपन्स इत्यादींचा समावेश असेल.